---Advertisement---

“आता अंडरग्राउंड व्हायची वेळ आली आहे”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाच्या उत्कृष्ट खेळीनंतर मांजरेकरांची उडतेय खिल्ली

On: गुरूवार, डिसेंबर 3, 2020 10:39 AM
---Advertisement---

कॅनबेरा | भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. एवढेच नव्हे, तर त्याने भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यातही मोलाची कामगिरी निभावली.

जडेजाच्या या खेळीमुळे त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. मात्र, त्याच्या या खेळीनंतर दिग्गज समालोचक संजय मांजरेकर यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडत आहे.

संजय मांजरेकर यांनी आयसीसी विश्वचषक 2019 दरम्यान रवींद्र जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की जडेजा वनडे संघात फक्त लहान-सहान गोष्टी करतो. म्हणजे तो एक चांगला फलंदाज किंवा चांगला गोलंदाजही नाही. पण यानंतर जडेजाने मांजरेकरांना आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले होते.

आता मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेदरम्यान पुन्हा एकदा जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सिडनी वनडे दरम्यान जडेजाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मांजरेकर म्हणाले होते की, “रवींद्र जडेजाबद्दल मला कोणतीही अडचण नाही.पण मला वनडे क्रिकेटमध्ये जडेजासारखे खेळाडू आवडत नाहीत.”

मांजरेकरांच्या या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात चांगली कामगिरी करून जडेजाने त्यांना पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीने उत्तर दिलं. त्यामुळे चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांजरेकरांना चांगलच ट्रोल केलं.

भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या (92 धावा) आणि रवींद्र जडेजा (66 धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सहाव्या विकेटसाठी भारतीय फलंदाजांनी केलेली ही वनडेमधील तिसरी सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘त्या’ खेळाडूच्या आगमनाने संघात आला ताजेपणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटची प्रतिक्रिया

याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने ५३ डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी

आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा बदल! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत ‘या’ संघाने गाठले अव्वल स्थान

ट्रेंडिंग लेख –

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त एका सामन्यात चौकार, षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा कुटणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---