वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने बुधवारी (दि. २० एप्रिल) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पोलार्डने हा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेटविश्वात हा एक चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएल २०२२ मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी पोलार्डविषयी स्पष्ट भूमिका मांडली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे चालू हंगामातील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. मांजरेकरांच्या मते पोलार्डने चालू आयपीएल हंगामात केलेल्या खराब प्रदर्शनामुळेच मुंबईला पहिले ६ सामने गमवावे लागले आहेत. माजरेकरांना वाटते की, यावर्षी पोलार्ड संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
माध्यमांशी बोलताना मांजरेकर पोलार्डविषयी व्यक्त झाले. त्यांच्या मते खराब प्रदर्शनामुळे पोलार्ड मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील फिट बसत नाहीये. ते म्हणाले की, “मला माहीत नाहीये की, मुंबई इंडियन्स पोलार्डला संघातून बाहेर करण्याचा विचार करत आहे की, नाही, पण मला वाटते की, पोलार्ड जर चार षटके टाकू शकत नसेल, तर त्याने कमीत कमी तीन षटके तरी टाकली पाहिजेत. कारण संघाला याची खूप गरज आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मला वाटते की, दबावाच्या परिस्थितीत तो त्याच्या संघातील अनेक गोलंदाजांपेक्षा चांगला आहे. अशात जर तो गोलंदाजी करत नाहीये आणि फक्त फलंदाजी करत आहे, तर मुंबईला त्याच्या धावा आणि योगदान पाहावे लागणार आहे,” असे मांजरेकर पुढे बोलताना म्हणाले.
पोलार्डने आयपीएलच्या चालू हंगामात खेळलेल्या सुरुवातीच्या ६ सामन्यात १६.४०च्या सरासरीने अवघ्या ८२ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी देखील त्याला फक्त एक विकेट घेता आली आहे. तसेच ६ सामन्यात त्याने आतापर्यंत फक्त ७ षटके गोलंदाजी करू शकला आहे. या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर मांजरेकरांनी पोलार्डवर निशाणा साधला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत- पाकिस्तानपेक्षा कमी नाही मुंबई आणि चेन्नईचा सामना’, असं का म्हणाला हरभजन सिंग?
अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: ए अँड ए शार्क्स संघाचा दुसरा विजय