---Advertisement---

काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 11:59 AM
Kuldeep-Yadav-And-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीने भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. चाहते त्यांना ‘कुलचा’ या नावार ओळखतात. परंतु मागच्या बऱ्याच दिवसांपासून या दोघांना देशासाठी एकत्र खेळताना पाहिले गेले नाहीये. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या मुद्यावर स्वतःचे मत व्यक्त केले आहे. संघ व्यवस्थापन या जोडीला सध्या एकत्र का खेळवू शकत नाही? याचे उत्तर त्यांना दिले. 

संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना वाटते की, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना शक्यता आता एकत्र खेळता येणार नाहीत. त्यांच्या मते किमान टी-२० क्रिकेटमध्ये तरी या दोघांना एकत्र खेळता येणार नाही. मांजरेकरांच्या म्हणण्याप्रमाणे अक्षर पटेल आणि चहल ही जोडी खेळू शकते किंवा चहलसोबत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो.

मांजरेकर म्हणाले की, “मला नाही वाटत की, कुलदीप यादव आणि चहलची जोडी भारतासाठी पुन्हा एकत्र खेळेल. कमीत कमी टी-२० क्रिकेटमध्येतरी असे होणार नाही, जिथे चहल आणि कुलदीप एकत्र खेळत आले आहेत. एकतर अक्षर पटेल आणि चहल खेळतील किंवा अश्विन आणि चहल ही जोडी खेळेल. जर चहल अनफिट असेल, तर कुलदीप यादवला एखाद्या सामन्यात खेळलवेल जाईल. ते पुन्हा एकत्र खेळतील, असे मला तर कुठेच दिसत नाहीये. शक्यता आहे की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे होऊ शकते.”

माजंरेकरांच्या मते अश्विन संघासाठी किफायशीर गोलंदाजी करत आहे. त्याने अलिकडच्या काळात स्वतःच्या इकोनॉमी रेटवर चांगले काम केले आहे. चहल मध्यक्रमात महत्वाच्या विकेट्स घेतो आणि अश्विन धावांवर लागम लावत असल्यामुळे संघासाठी ही जोडी खूपच फायद्याची ठरत आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, कुलदीप सध्या संघातून बाहेर असला, तरी त्याने आयपीएल २०२२ हंगाम चांगलाच गाजवला आहे. त्याने दिल्ली डेअरडेविल्स हंगामात एकूण २१ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलनंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत कुलदीप खेळणार होता. परंतु सराव सत्रादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. आफ्रिकी संघाविरुद्धच्या या मालिकेतून कुलदीपने माघार घेतल्यानंतर त्याला अद्याप पुनरागमन करता आले नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

विराट, रोहितसोबत जे घडतंय, तेच सचिन आणि गांगुलीसोबतही घडून गेलंय; बीसीसीआय अधिकाऱ्याचे भाष्य

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग

जय हो..! भारतीय कुस्तीपटूंनी पाडला पदकांचा पाऊस; बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक सुवर्णपदकाचे मानकरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---