भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांच्या महानतेवर कधीही शंका केली जाऊ शकत नाही. हे फलंदाज त्यांच्या अफलातून शैलीने, त्यांच्या जबरदस्त मानसिकतेने आणि कमालीच्या धैर्याने विरुद्ध संघाच्या खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळवत होते. मात्र, त्यांची खेळी ही नेहमी रक्षात्मक स्वरुपाची होती. ते येणाऱ्या प्रत्येक चेंडूचा सन्मान करत असत.
यामध्ये कपिल देवचा समावेश होता. ते नेहमी चौकार आणि षटकार मारण्याच्या मानसिकतेने मैदानावर उतरत असायचे. पण त्यांच्यात विकेट सांभाळून दमदार खेळी करण्याची क्षमता होती. त्यांच्यानंतर भारतीय संघाला अशाच एका दमदार क्रिकेटपटूची गरज होती. ही कमी ९०च्या दशकातील एका फलंदाजाने भरुन काढली. त्याच्या भारतीय संघातील आगमनाने येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी नवा मार्ग दाखवुन दिला. Sanjay Manjrekar named first indian batsman who sent good ball to the boundaries
हा फलंदाज अजून कोण नसून तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनविषयी बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, १९९०च्या दशकात भारतीय संघ सचिनवर खूप जास्त प्रमाणात निर्भर होता. सचिन हा मांजरेकरचा माजी संघ सहकारी होता. दोघांनी मिळून १९९० ते १९९९ दरम्यान वनडेत ८५७१ धावा आणि कसोटीत ५६७१ धावांची भागिदारी केली होती.
इंस्टाग्राम लाइव्हवर बोलताना मांजरेकर म्हणाले की, “९०च्या दशकात फक्त एकट्या सचिनने विरुद्ध संघाची धुलाई करतानाचे दृश्य पाहणे सर्वसाधारण होते. मात्र, इतर फलंदाजांना परदेशातील मैदानावर खेळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असायचा. त्याने १९९२ला पर्थ आणि सिडनीमध्ये ११४ आणि १४८ धावांची खेळी होती. तसेच, १९९२सालची जोहान्सबर्ग येथील १११ धावांची खेळी आणि १९९७सालची केपटाऊन येथील १६९ धावांची खेळी हे त्याच्यातील प्रतिभेचा आरसा आहेत.”
“दुर्दैवाने १९९६-९७ला भारतीय संघ वास्तवात सचिनवर निर्भर होता. कारण तो खूप पारंगत फलंदाज होता. तो चांगल्या चेंडूवर फटकेबाजी करण्यात पूर्णपणे सक्षम होता. त्याच्यापुर्वी भारतीय संघ हा रक्षात्मक फलंदाजी आणि खराब चेंडूंवर शॉट मारण्यासाठी ओळखला जात होता. पण सचिनने भारतीय संघाला चांगल्या चेंडूवर शॉट मारायला शिकवले,” असे मांजरेकर पुढे म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
७० शतकं केलेला विराट म्हणतो, या गोलंदाजापुढे ठरलो होतो मुर्ख
४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश