भारत आणि नामिबिया यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट अ चा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नामिबियाचा कर्णधार जेरार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सलामीवीर अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला. शिवाय, मागील सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाबाहेर गेला आहे.
वर्ल्ड कप डेब्यू सामन्यात संजूने विस्फोटक खेळी करत 22 धावा केल्या. त्याने यासाठी केवळ 8 चेंडूचा वापर केल्या. त्याच्या या छोट्या खेळीतही त्याने 3 षटकार 1 चाैकाप मारला. फाॅर्मसाठी झगडणाऱ्या संजूसाठी ही खेळी संजीवनी ठरली आहे. मात्र तो डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद झाला. पण त्याची ही आक्रमक खेळी टीम इंडियासाठी गूड न्यूज आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
नामीबिया: लौरें स्टीनकॅम्प, जान फ्रिलिंक, जान निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, झेन ग्रीन (विकेटकीपर), रूबेन ट्रम्पेलमॅन, मालन क्रुगर, बर्नार्ड शोल्ट्झ, बेन शिकोंगो, मॅक्स हींगो





