संजू सॅमसन भारतीय संघाचा एक अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. सध्या सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सॅमसनचे नेतृत्व आणि वैयक्तिक प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. सॅमसनने आपल्या नेतृत्वाने दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार एबी डिविलियर्स याला प्रभावित केले आहे. डिविलियर्सच्या मते सॅमसन येत्या काळात भारताचे नेतृत्व करू शकतो.
आयपीएल 2021 (IPL) मध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार बनला होता. सॅमसनच्या नेतृत्वाती पहिल्या हंगामात संघाचे प्रदर्शन जास्तकाही खास ठरले नाही. पण आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने चांगलाच गदारोळ घातला. सॅमसनच्या नेतृत्वात संघ मागच्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. आयपीएलमध्ये आपली गुणवत्ता दाखवली असली, तरी सॅमसनने अद्याप भारतीय संघात आपले नियमित स्थान मिळवले नाहीये. असे असले तरी, एबी डिविलियर्स (AB de Villiers) याच्या मते सॅमनस भविष्यात तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.
जिओ सिनेमाशी बोलताना सॅमसन म्हणाला की, “आपल्या सर्वांना माहिती आहे संजू सॅमसन एक अप्रतिम खेळाडू आहे. पण त्याचे नेतृत्व कसे आहे? असा प्रश्न विचारला जातो. तर माझे उत्तर हेच आहे की, तो संयमी आसंत आणि निवांत राहणारा व्यक्ती आहे. तो अजूनही कोणत्याच गोष्टीमुळे चिंतेत नाहीये. कर्णधार म्हणून ही गोष्ट अतिशय चांगली आहे. त्याची रणनीती देखील चांगली असते. मला वाटते तो अजूनही सुधारणा करू शकतो आणि येत्या काळात सुधारणा करत राहील.”
“असे असले तरी, तो एक अप्रितम कर्णधार बनण्यासाठी सर्व योग्यता आहेत, असे मला वाटते. आपण सांगू शकत नाही, पण तो दोन-तीन वर्षात भारतीय संघाचे कोणत्याही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करू शकतो. मला वाटते या जबाबदारीमुळे त्याचे त्याचे क्रिकेट अधिक सुधारेल,” असेही डिविलियर्स पुढे म्हणाला. दरम्यान, सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान संघाने हंगामातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 72 धावांनी जिंकला होता. हंगामातील दुसऱ्या सामन्यात मात्र राजस्थानला पंजाब किंग्जकडून 5 धावांनी पराभव मिळाला. राजस्थानला हंगामातील तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शनिवारी (8 एप्रिल) गुवाहाटीमध्ये खेळायचा आहे. (‘Sanju Samson can lead India in the future,’ said AB de Villiers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेचे प्रशिक्षकच आपल्या खेळाडूंवर नाराज? मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी अशा शब्दांत केली कानउघडणी
आरसीबीला धूळ चारल्यानंतर केकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये ‘चक दे इंडिया’चे वातावरण, कोच स्वतः शाहरुख