भारतीय संघाचा गणवंत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन नेहमीच संघातून आत बाहेर होत आला आहे. अनेकांच्या मते त्याला संघाकडून अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. संजूने २०१५ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत त्याने फक्त ६ एकदिवसीय आणि १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. असे असले तरी, त्याच्या मते आयुष्यात जे काही होते, त्याच्या तुमच्यावर सकारातम्क परिणाम होत असतो. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये सामनावीर ठरल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या एखदिवसीय मालिकेत भारताने जबरदस्त प्रदर्शन केले आणि मालिकाही नावावर केली. दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन एकूण ३९ चेंडू खेळला आणि नाबाद ४३ धावांचे योगदान दिले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले. भारताने हा सामना ५ विकेट्सने नावावर केला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनेड सामन्यापूर्वी संजू सॅमसन म्हणाला की, “मला मध्यक्रमात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. दबावाच्या परिस्थितीत मी स्वतःला आजमावू इच्छित होतो. ते काही चांगले बाउंसर चेंडू टाकत होते, पण फलंदाजी करताना मजा आली.” सतत संघातून आत-बाहेर होण्याविषयी संजू म्हणाला, “इमानदारने सांगायचे झाले तर तुम्ही आयुष्यात ज्या परिस्थितीतून जाता, त्याचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होतो.”
“नक्कीच माझ्या सर्व मित्रांना देशासाठी खेळताना पाहणे कठीण होते, पण यादरम्यान देशांतर्गत क्रिकेट खेळून मला मजा आली. कर्णदारपदाने खेळाविषयी माझा दृष्टीकोण बदलला. त्यामुळे माझी विचार करण्याची पद्धत बदललून अधिक चांगली झाली आहे. मला आश्चर्य वाटते की, जेव्हा कुठेही जातो, तेव्हा मला एवढे समर्थन मिळते. अनेकजण मला ‘चेट्टा’ म्हणून बोलवतात. मल्याळी क्रिकेट असून देशासाठी खेळत असल्याचा मला अभिमान आहे,” असेही संजू पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील या एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारताने १० विकेट्स राखून, तर दुसऱ्या सामन्यात ५ विकेट्स राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात भारताकडे यजमान संघाला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…