भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला नेहमीच निवडकरत्यांकडून डावलण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती सध्या समोर येत आहे. भारतीय संघातून वारंवार बाहेर बसवले जाणाऱ्या संजू सॅमसन याला आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून खेळण्यासाठी प्रस्ताव दिला गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संजूने हा प्रस्ताव नाकारल्याचे देखील समोर येत आहे.
सॅमसनला मिळाला आयर्लंडकडून खेळण्याचा प्रस्ताव –
माध्यमांतील वृत्तांनुसार आयर्लंड क्रिकेट बोर्ड (Ireland Cricket) त्यांच्या संघात संजू सॅमसन (Sanju Samson) याला सामील करू इच्छित आहे. याच पार्श्वभूमीवर बोर्डाने सॅमसनला त्यांच्या ताफ्यात साहभागी होण्यासाठी प्रस्ताव देखील दिला आहे. माहितीनुसार आयर्लंडकडून सॅमसनला प्रत्येक सामन्यात खेळण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच संघाचे कर्णधारपद देखील त्याला मिळू शकते. असे असले तरी, भारताच्या या गुणवंत खेळाडूंने आपला देश सोडून इतर कोणत्याही संघासाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सॅमसनकडून प्रस्तावाला नकार –
माहितीनुसार आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून मिळालेला हा प्रस्ताव सॅमसनसाठी मोठा असला, तरी त्याने पूर्ण सन्मानाने त्यांना नकार कळवला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार सॅमसनने आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे आभार मानत त्यांचा प्रस्ताव स्वीकरण्यासाठी नकार दिला आहे. नकार दिल्यानंतर त्याने असेही सांगितले की, जोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत फक्त भारतासाठीच खेळेल. भारताव्यतिरिक्त तो इतर कोणत्या देशाकडून खेळण्याचा विचार देखील करू शकत नाही.
दरम्यान, यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक आणि आशिया चषकात सॅमसनला संधी मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्याला या दोन्ही संघांतून बाहेर ठेवले. नुकत्याच पार पडलेल्या भारतताच्या न्यूझीलंड दौऱ्यात सॅमसनल वनडे मालिकेत संघाचा भाग होता. पण मालिकेतील एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मात्र दिली गेली नाही. त्याने भारतासाठी 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पण दरम्यानच्या मोठ्या काळात त्याला संघातून बाहेरच बसवले गेले. त्याने आतापर्यंत भारतासाठी 11 वनडे आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (Sanju Samson rejected Ireland Cricket’s offer)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!
वॉर्नरवर घातलेली कर्णधारपदाची बंदी चुकीची! स्टीव स्मिथकडूनही मिळाला पाठिंबा