जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. हा सामना 18 जूनपासून इंग्लंड येथील साउथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवला जाईल. मात्र या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन काय असावी, याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः गोलंदाजी फळीत जोरदार स्पर्धा असल्याने कोणाची निवड केली जाईल, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
आता भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख सरनदीप सिंग यांनी याविषयी भाष्य केले आहे.. त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणाला चौथा वेगवान गोलंदाज म्हणून कोणाची निवड करावी, यावर मत व्यक्त केले आहे. त्यांनी मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या दोघांमधून भारतासाठी कोण चौथा गोलंदाज म्हणून कोण असावे, हे स्पष्ट केले. तसेच त्यामागील कारण देखील सांगितले आहे.
‘या’ गोलंदाजाला दिली पसंती
सरनदीप सिंग फलंदाजीच्या कौशल्यामुळे शार्दुल ठाकूरला मोहम्मद सिराजपेक्षा जास्त पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शार्दुलने त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेचे एक चांगले उदाहरण सादर केले होते. माजी राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांना वाटते की जर साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत चार वेगवान गोलंदाजांसह उतरला तर मोहम्मद सिराज ऐवजी शार्दूल ठाकूरला प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा द्यावी.
सद्य परिस्थितीनुसार भारत 18 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटू गोलंदाजांसह सामन्यात उतरु शकतो. सरनदीप सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, “जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याबरोबर खेळू शकता. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून मी शार्दूलची निवड करेन. अर्थात सिराजनेही चांगली कामगिरी केली आहे.”
ते पुढे म्हणाले “आपल्याला फलंदाजीचे क्रम बघणे, देखील आवश्यक आहे. आणि शार्दुल एक अतिरिक्त फलंदाज म्हणून पर्याय प्रदान करतो. वेगवान गोलंदाजांना साऊथॅम्प्टनलाही मदत मिळेल आणि शार्दुल चेंडूला स्विंग करु शकेल. त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये बर्याच वर्षांचा अनुभव आहे. अशावेळी भारतीय संघाने रवींद्र जडेजाला बाहेर ठेवायला हवे. आर अश्विनने खेळायलाच हवे, कारण न्यूझीलंडच्या संघात डावखुरा फलंदाज बरेच आहेत.”
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
स्टँडबाय खेळाडूः अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला.
महत्वाच्या बातम्या
चक्क १० व्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात करूनही भविष्यात ‘तो’ न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर बनला
‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय
किती हा राग? एकाच सामन्यात दोन वेळा सुटला शाकिबचा संयम, रागाच्या भरात उखडले स्टंप्स