भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. 4 दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. फलंदाज मोमिनुल हकच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या. प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वालच्या 72 धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर 285 धावा करत भारतीय संघाने 52 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ 2 बाद 26 धावा अशा स्थितीत आहे.
दरम्यान, यजमान भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील 3 खेळाडू संघापासून वेगळे झाले आहेत. हे खेळाडू पाव्या दिवशी संघासोबत नसतील. बीसीसीआयने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
बीसीसीआयने ही माहिती दिली
बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, ‘सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना लखनऊमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या इराणी चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय कसोटी संघातून सोडण्यात आले आहे.’
या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत हे तिन्ही खेळाडू मंगळवारपासून (01 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या इराणी चषकासाठी आपापल्या संघात सामील होतील. सरफराज खान मुंबई संघाचा भाग आहे, तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे रेस्ट ऑफ इंडिया संघाचा भाग आहेत.
Update: Sarfaraz Khan, Dhruv Jurel and Yash Dayal have been released from India’s Test squad to participate in the #IraniCup, scheduled to commence tomorrow in Lucknow. pic.twitter.com/E0AsPuIVYX
— BCCI (@BCCI) September 30, 2024
रेस्ट ऑफ इंडिया
रुतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
मुंबई संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधातराव (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल मोहम्मद जुनेद, मोहम्मद ठक्कर, हिमांशू सिंग. खान, रॉयस्टन डायस, सरफराज खान.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला स्वत:चा अभिमान’, 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याने जडेजाची प्रतिक्रिया
कोहली की रूट? न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…