भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिली कसोटी 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी करत बांग्लादेशचा 280 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
आता या मालिकेतील दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने पहिली कसोटी संपताच संघाची घोषणा केली होती आणि त्याच 16 खेळाडूंना कायम ठेवले होते. दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सर्फराज खानच्या नावाचाही समावेश आहे. जो केएल राहुलमुळे पहिला सामना खेळू शकला नाही. आता सर्फराज दुसऱ्या कसोटीतही खेळणार हे निश्चित दिसत नाही. कारण त्याच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
सर्फराज खानला टीम इंडियाच्या संघातून बाहेर केले जाऊ शकते
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, बीसीसीआय 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या इराणी चषकासाठी सर्फराज खानला भारतीय संघातून बाहेर काढण्याचा विचार करत आहे. जेणेकरून तो मुंबईसाठी सामन्यात सहभागी होऊ शकेल. अशा परिस्थितीत या फलंदाजाला दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल अशी आशा फारशी दिसत नाही. मात्र शेवटच्या क्षणी कोणताही खेळाडू जखमी झाल्यास सर्फराजला सोडले जाणार नाही. असे ही सांगण्यात आले.
इराणी कप आधी मुंबईत आयोजित केला जाणार होता. पण आाता स्पर्धा लखनऊला हलवण्यात आली आहे. या सामन्यात नुकत्याच झालेल्या रणजी मोसमात विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईचा सामना बाकीच्या भारतीय संघाशी होणार आहे. सर्फराजशिवाय, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे देखील मुंबईसाठी खेळण्याची शक्यता आहे. तर संघाची कमान अनुभवी अजिंक्य रहाणेकडे असेल.
हेही वाचा-
एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी पंचांना किती पगार मिळतो?
कानपूरची खेळपट्टी फिरकीसाठी लाभदायी; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची रणनीती काय असू शकते?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज