---Advertisement---

सरफराज खानला मोठा धक्का, ‘या’ 3 कारणांमुळे भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही!

On: शनिवार, मे 24, 2025 5:51 PM
GaOeXiKbUAQgCN7
---Advertisement---

काही वर्षांपूर्वी घरेलू क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून टीम इंडियामध्ये (Team india) स्वतःचे स्थान निर्माण करणारा मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला (Safaraz khan) पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. एका बाजूला सरफराज काही महिन्यांपासून त्याच्या फलंदाजी आणि फिटनेसवर घाम गाळून काम करत आहे. तसेच त्याने 10 किलो वजन कमी केले आहे. पण शनिवारी इंग्लंड विरुद्ध (Eng vs Ind) होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, पण या संघात त्याला निवडण्यात आले नाही. या निर्णयाने करोडो चाहत्यांना सुद्धा आश्चर्यचकित केले आहे. जाणून घेऊया की असं कोणतं कारण होतं ज्यामुळे त्याला संघात स्थान मिळालं नाही.

मागच्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध (NZ vs IND ) 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या डावात 0 धावा केल्यानंतर बंगळूरूच्या कसोटी दुसऱ्या डावात त्याने 150 धावा केल्या. पुन्हा पुणे आणि मुंबईच्या कसोटी 4 डावांमध्ये सर्फराजने क्रमवारीने 11, 9, 0, 1 अशा धावा केल्या. प्रेस कॉन्फरन्समध्ये आगरकर म्हणाले, मला माहित आहे की न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये सरफराजने शतक झळकावले पण त्यानंतर त्याच्या बॅटने म्हणावी तशी प्रभावी कामगिरी केली नाही. कधी-कधी निर्णय टीम मॅनेजमेंट कडून घेतला जातो.

मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हणाले, सिलेक्शन कमिटीने हा निर्णय भारतीय क्रिकेटमध्ये (Indian cricket) घडलेल्या काही हालचाली आणि कंडिशन बघून घेतला आहे आणि हा निर्णय काही व्यक्तिगत विशेष खेळाडूंच्या विरुद्ध जाऊ शकतो, किंवा त्यांच्यासाठी चुकीचा ठरू शकतो. यामध्ये कोणतीच शंका नाही की, मागच्या दोन हंगामात घरेलू क्रिकेटमध्ये जसं प्रदर्शन साई सुदर्शन (sai sudarshan) आणि करून नायर (karun nair) यांनी केला आहे. त्यामुळे सुद्धा सर्फराजसाठी अडचणी निर्माण झाल्या. शार्दुल ठाकूर (Shardul thakur) आणि वॉशिंग्टन सुंदर (washington Sunder) यांच्या पुनरागमनाने सुद्धा सर्फराजला नुकसान पोहोचवण्याचे काम केले.

ही गोष्ट खरी आहे की, कोहली रिटायर (virat kohli test cricket retirement) झाल्यानंतर भारताला मधल्या फळीत अनुभवी फलंदाजाची गरज आहे आणि सरफराजने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच विदेशी मैदानावर त्याने पदार्पण करणे अजून बाकी आहे. हेच कारण आहे की, निवडकर्त्यांनी करूण नायरची (karun nair) निवड केली. ज्याने मागच्या दोन हंगामात घरेलू क्रिकेटमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना आगरकर म्हणाले, विराटच्या निवृत्तीनंतर आम्हाला मधल्या फळीत अनुभवी फलंदाजाची गरज होती. एखाद्या सोबत चुकीचे वागणे दुसऱ्यासाठी बरोबर ठरते. सध्या करुणने धावा करण्यात चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याच्याकडे काउंटी क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---