मुंबई रणजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरफराज खानने जबरदस्त शतकी खेळी केली. रणजी ट्रॉफी २०२२ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला जात आहे. पहिल्या डावात मुंबईने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. यामध्ये त्यांचा मध्यक्रमातील फलंदाज सरफराजने १५३ धावांचे योगदान दिले आणि चालू हंगामातील स्वतःच्या ६०० धावा पूर्ण केल्या. सरफराज चालू रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. एका खास यादीत त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमननंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे.
मुंबई आणि उत्तराखंड (Mumbai vs Uttarakhand, 2nd Quarter-Final) यांच्यात खेळल्या जाणारा रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्यपूर्व सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. मुंबईचा मध्यक्रमातील फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) संपूर्ण हंगामात ज्या पद्धतीने खेळत आला आहे, अगती त्याच पद्धतीने या महत्वाच्या सामन्यात देखील खेळला. त्याने अवघ्या १४० चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने या डावात एकूण २०५ चेंडू खेळले, ज्यामध्ये १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५३ धावा केल्या. रणजी ट्रॉफी २०२२ मधील ५ डावांमध्ये त्याने १५६ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत.
सरफराजचे हे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सातवे शतक आहे आणि या सातही वेळा त्याने १५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. या सात शतकी खेळींमध्ये त्याच्या एका तिहेरी शतकांचा आणि ३ द्विशतकांचाही समावेश आहे.
सरफराजाने आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. या धावा त्याने ८० पेक्षा अधिकच्या सरासरीने केल्या आहेत. ही डॉन ब्रॅडमन (Don Bradman) नंतर दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी ९५.१४च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या. विजय मर्चंट यांनी ७१.६४, जॉर्ज हेडली यांनी ६९.८६ आणि बहिर शाह यांनी ५९.०२च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणीमध्ये सर्वोत्तम सरासरीने असणारे फलंदाज (पहिल्या २००० धावा करताना)
डॉन ब्रॅडमन – ९५.१४
सरफराज खान – ८० हून अधिक
विजय मर्चंट – ७१.६४
जॉर्ज हेडली – ६९.८६
बहिर शाह – ६९.०२
दरम्यान, आयपीएल २०२२मध्ये सरफराज दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, पण त्याला संघाकडून अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. परंतु देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाने सरफराज प्रत्येकाच्या नजरेत आला आहे. त्याला भारतीय संघात संधी देण्यासाठी चाहत्यांकडून मागणी होऊ लागली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! धनश्री नाहीये चहलचं पहिलं प्रेम, खुद्द तिनेच केलाय खुलासा
आयपीएलचे हिरो, रणजीत झिरो! क्वार्टर फायनलमध्ये गिल-मयंकसह सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ क्रिकेटर