भारतीय संघाने मायदेशात खेळवलेल्या टी20 आणि वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, टी20 विश्वचषक 2022स्पर्धेत भारतीय संघाच्या पारड्यात पहिला वहिला पराभव पडला. या पराभवाचे कारण दक्षिण आफ्रिका संघ ठरला. रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला 5 विकेट्सने सामना खिशात घातला. या सामन्यात विजय मिळवताच संघाने गुणतालिकेतील स्थान भक्कम केलेच, सोबतच त्यांच्या कर्णधाराच्या नावावर खास विक्रमही रचला गेला.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा केल्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने 19.4 षटकात 5 विकेट्स गमावत आणि 137 धावा करत पार केले. या विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
A thrilling win for South Africa and it takes them to the top of the table in Group 2 💪#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/rUCaVyQgNE pic.twitter.com/k8n6WuzjXP
— T20 World Cup (@T20WorldCup) October 30, 2022
टेम्बा बावुमाचा विक्रम
टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने टी20 विश्वचषकातील मागील 7 सामन्यांमध्ये उत्तुंग कामगिरी केली. या टी20 विश्वचषक 2022मधील दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना सोडला, तर उर्वरित 6 सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला आहे. हा एकप्रकारचा विक्रम बावुमाने आपल्या नावावर केला आहे.
दक्षिण आफ्रिका सामन्याचा आढावा
भारताने दिलेल्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर (David Miller) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूंचा सामना करताना नाबाद 59 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त एडेन मार्करम (Aiden Markram) यानेही 41 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारही मारले. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचे आव्हान पार केले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कुणालाही 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार टेम्बा बावुमा याला फक्त 10 धावा करण्यात यश आले.
या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाने 3 सामन्यात 2 विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यांचे 5 गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट 2.772 इतका आहे. या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी भारतीय संघ असून त्यांचे 4 गुण आणि नेट रनरेट 0.844 इतका आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी
रोहित अन् विराट फ्लॉप, पण सूर्या ऑन फायर, टी20 विश्वचषकात भारतासाठी ठोकल्या बॅक टू बॅक फिफ्टी