---Advertisement---

“सर्व तितकं भयानक नव्हतं जितकं सर्वांना वाटत होतं”, आजारातून बाहेर आल्यानंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया

On: बुधवार, फेब्रुवारी 17, 2021 8:59 PM
Sourav Ganguly
---Advertisement---

भारतीय संघाचे पूर्व कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. जानेवारी महिन्यात त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनतर त्यांच्यावर दोनवेळा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. पण आता सौरव गांगुली आता पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि पुन्हा आपला कार्यभार सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महिनाभराचा कालावधी संपल्यानंतर ते पहिल्यांदा मिडीयासमोर आले आहेत. आपल्या आरोग्याविषयी बोलतांना ते म्हणाले,” माझी प्रकृती इतकी ही गंभीर नव्हती, जसे की लोकांना वाटत होते.”

गांगुलींनी स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखतीत म्हटले की, ” मी एकदम व्यवस्थित आहे. हा, थोडी भीती वाटत होती , परंतु नशिबाने हे तितके भयानक नव्हते जीतके सर्वांना वाटत होते. मी एकदम मस्त आहे आणि कामवर पुन्हा आलो आहे.”

प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये बोलवण्याबाबत गांगुली म्हणाले..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी देण्यात आली होती. यावर सौरव गांगुली म्हणाले की, “आम्हाला प्रेक्षकांना पुन्हा मैदानात पाहायचे होते. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही असे करू शकलो असतो. परंतु, आम्ही तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले होते की, पहिल्या कसोटी सामन्याचा अंदाज घेऊन ते परिस्थितीचा आढावा घेणार होते. कारण खूप कालावधीनंतर इथे सामना खेळवला जाणार होता.”

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ : ‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक संघाचे महागडे खेळाडू

आयपीएल २०२१ : सर्वाधिक रकमेसह लिलावात उतरणाऱ्या पंजाब संघाचे ‘या’ खेळाडूंवर असेल लक्ष

आयपीएल २०२१ : पंजाबचा नवा लोगो आला रे ! केला ‘हा’ मुख्य बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---