---Advertisement---

सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…

On: रविवार, जानेवारी 3, 2021 7:18 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची शनिवारी(2 डिसेंबर) अचानक छातीत दुखायला लागल्याने त्यांना कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वडीलांची तब्येत बिघडल्यानंतर मुलगी सना गांगुली हिने सांगितले की, आता तिच्या वडिलांची तब्येत व्यवस्थित आणि स्थिर आहे.

सौरभ गांगुली यांना शनिवारी घरात व्यायाम करताना, त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सना गांगुलीने सांगितली की, “सौरव गांगुली यांची तब्येत व्यवस्थित आणि स्थिर आहे.”

यापूर्वी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते की, त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांच्या नसांमध्ये स्टेंट सोडले आहे. आता सौरव गांगुली ठीक आहेत.

ज्या प्रकारे सौरव गांगुली यांची तब्येत बिघडली असल्याची कळाले आहे. त्यापासून लोक सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी सौरव गांगुली यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करण्यासाठी गांगुली यांच्या पत्नी डोना यांना फोन केला होता.

त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गांगुली यांची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. गांगुली यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “ते व्यवस्थित आहेत.” तसेच पाश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी सौरव गांगुली यांच्या तब्येतसाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर ते म्हणाले की,” मी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि भावांसोबत बोललो आहे. ”

सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 113 कसोटी, 311 वनडे आणि 77 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामधे त्यांनी कसोटीत 42.2 च्या सरासरी 7212 धावा केल्या आहेत. वनडेत क्रिकेटमध्ये 41 च्या सरासरीने 11363 धावा काढल्या आहेत. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये 25 च्या सरासरीने 1726 धावा केल्या आहेत.

तसेच त्यांनी आयपीएल स्पर्धेत भाग घेत 59 सामने खेळले आहेत. त्यामधे 25.4 च्या सरासरीने 1349 धावा काढल्या आहेत. ते आयपीएल स्पर्धेत 2008 पासून 2012 पर्यंत खेळत होते. कसोटी क्रिकेटमध्ये 1996 ते 2008 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

महत्त्वाच्या बातम्या –

मयंक अगरवालच्या अपयशाचे कारण सांगत ‘या’ दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

…तरीही रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शुबमन गिल सिडनी कसोटीत खेळणार

मेलबर्न येथे होणारे भारतीय संघाचे सराव सत्र ‘या’ कारणामुळे झाले रद्द 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---