भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळला. हा सामना जिंकत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रदीर्घ काळ प्रशासक असलेले माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
एक क्रिकेटपटू, प्रशासक आणि चाहता म्हणून सौरव गांगुली कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला चांगल्या प्रकारे ओळखतात. सौरव गांगुली म्हणाले की, “रविवारी (२१ नोव्हेंबर) ईडन गार्डन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात ‘दव’ हा घटक महत्त्वाचा सिद्ध होऊ शकतो. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील पहिल्या टी-२० सामन्यात आणि रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियमवरील दुसऱ्या सामन्यातही दव हा एक मोठा घटक ठरला होता.”
सौरव गांगुली म्हणाले, “ईडनची खेळपट्टी नेहमीप्रमाणे चांगली आहे, पण ‘दव’ हा घटक सामन्यात महत्त्वाचा सिद्ध होऊ शकतो. बघूया काय होते ते.”
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) संध्याकाळी ईडन गार्डन्सला भेट दिली होती. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी जमिनीवर विशेष प्रकारची फवारणी केली जाणार आहे. मात्र, त्यात कितपत यश येते हे सामन्याच्या दिवशी कळेल.
सौरव गांगुली यांच्या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्यांना आव्हानाचा पाठलाग करताना खूप अडचणी येतील. सात वाजल्यापासून दवाचा प्रभाव सुरू होत असला तरी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. कारण वेगवान गोलंदाजांना तसेच फिरकीपटूंना ओला चेंडू पकडणे कठीण जाते आणि त्याचा फायदा फलंदाजीला होतो. अशा परिस्थितीत जो संघ नाणेफेक जिंकेल, त्याला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात
टी२० मालिकेनंतर ‘हे’ दोघे करणार दक्षिण आफ्रिकेला प्रयाण; शार्दुलचाही होऊ शकतो समावेश






