सध्याचा भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत वर्चस्वपूर्ण खेळ करतो आहे. तसेच मायदेशातच नव्हे तर परदेशातही कठीण परिस्थितीत देखील भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो आहे. त्यामुळे या संघाच्या कामगिरीची भुरळ दिग्गजांना नाही पडली तरच नवल. यातच आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची भर पडली आहे.
सध्याच्या भारतीय संघाचे अनेक दिग्गजांनी भरभरून कौतुक केले आहे. संघातील सगळेच खेळाडू संधी मिळताच फायदा उठवून दमदार कामगिरी करत आहेत. आता गांगुलीने या संघातील आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
युवा खेळाडूने केले गांगुलीला प्रभावित
भारतीय संघाकडून गेल्या काही महिन्यात एका खेळाडूने आपल्या जबरदस्त कामगिरीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तो खेळाडू म्हणजे रिषभ पंत. सौरव गांगुलीला देखील याच खेळाडूने सर्वाधिक प्रभावित केले आहे. गांगुलीने पंतला कौतुकाची थाप दिली आहे.
तो म्हणाला, “रिषभ पंत हा भारताचा भविष्यातील महान क्रिकेटर असेल. तो सध्याच्या भारतीय संघातील नमस्कार माझा अतिशय आवडता खेळाडू आहे. मला रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते. पण रिषभ पंतच्या फलंदाजीचा मी फॅन झालो आहे.”
गांगुलीने भारतीय संघातील गोलंदाजांचे देखील यावेळी कौतुक केले. तो म्हणाला, “मी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा चाहता आहे. मोहम्मद शमी देखील एक उत्तम गोलंदाज आहे. याशिवाय शार्दूल ठाकूरने गेल्या काही महिन्यात केलेल्या कामगिरीने मला प्रभावित केले आहे. त्याचा खेळाप्रति असलेला दृष्टिकोन मला भावतो.”
महत्वाच्या बातम्या:
आगामी आयपीएलमध्ये हे तीन मुंबईकर उडवू शकतात भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज
असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे, या दिग्गजाचा दावा