गोवा, दिनांक ११ डिसेंबर – हिरो इंडियन सुपर लीग ( आयएसएल) मध्ये आतापर्यंत विजयाची पाटी कोरी राहणारा एकमेव संघ एससी ईस्ट बंगालला रविवारी केरळा ब्लास्टर्सच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात ईस्ट बंगालला विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यांना पाच सामन्यांत केवळ दोनच गुण कमावता आले आहेत. तर, दुसरीकडे केरळा ब्लास्टर्स ४ सामन्यांत ५ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी मागील लढतीत ओडिशा एफसीवर २-१ असा विजय मिळवला.
कोलकाताच्या ईस्ट बंगाल क्लबचा आतापर्यंतचा प्रवास हा खाचखळग्यांचा राहिला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी जमशेदपूर एफसीला १-१ अशा बरोबरीत रोखले. जोश मॅन्युएल डाएझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ईस्ट बंगाल संघाला पुढील दोन सामन्यांत एटीके मोहन बागान ( ३-०) व ओडिशा एफसी ( ६-४) यांच्याकडून हार पत्करावी लागली. चेन्नईयन एफसीला त्यांनी गोलशून्य बरोबरीत रोखले. परंतु पाचव्या सामन्यात एफसी गोवाविरुद्ध दर्जेदार खेळ करूनही ३-४ असा पराभव पत्करावा लागला.
१०० वर्षांची परंपरा असलेल्या या क्लबला दुखापतीगचे ग्रहण लागले आहे. गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य, जॅकीचंद सिंग आमि डॅरेन सिडोएल हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. ”प्रत्येक सामन्यातून स्वतःच्या खेळाचा दर्जा उंचावला गेला पाहिले आणि प्रत्येक सामन्यातील निर्णय क्षमतेतही सुधारणा करायला हवी. आतापर्यंत आम्ही पाच सामने खेळलो आहोत आणि त्यापैकी काही सामन्यांत विजयाची संधी असूनही तो मिळवण्यात आम्ही अपयशी ठऱलो. जॅकीचंद व डॅरेन यांची दुखापत हिच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. जॅकीच्या तंदुरुस्तीत सुधारणा होतेय, परंतु तो पूर्णपणे बरा झालेला नाही. डॅरेन मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे बाहेर आहे,”असे प्रशिक्षक जोस डाएझ यांनी सांगितले.
केरळा ब्लास्टर्स गुणतालिकेत मध्यक्रमावर आहेत आणि त्यात मागील सामन्यात ओडिशा एफसीवर मिळवलेल्या विजयानं त्यांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला आहे. अॅड्रीयन लुनानं केरळाला पहिला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यानं दोन्ही गोल करण्यास सहकाऱ्यांना सहाय्य केले. त्यानं निर्माण करून दिलेल्या दोन संधींमुळे केरळानं २-१ अशा फरकानं ओडिशाला पराभूत केले. ”लुना आमच्या संघात असल्याचा आनंद आहे. तो केवळ मैदानात संघाला सहाय्य करून त्याची भूमिका पार पाडत नाही, तर तो एक चांगला व्यक्तीही आहे,”असे केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोव्हिच यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’