सोमवारी (16 ऑक्टोबर) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर वादळी वाऱ्यांसह काही प्रमाणात पाऊस झाला. परिणामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामना काही वेळेसाठी थांबवला गेला होता. आयसीसीने वनडे विश्वचषक भारतात होत असल्यामुळे सर्व स्टेडियमचे सुशोभीकरण केले. पण वादळी वाऱ्यांमुळे इकाना स्टेडियममध्ये लावलेले होर्डिंग्स स्टॅन्टसमध्ये येऊन पडले.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना सोमवारी (16 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता लखनऊच्या इकाना स्टेडियमवर सुरू झाला. ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन संघाला सलामीवीर फलंदाज मथूम निसांका आणि कुसल परेरा यांनी शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर संघ अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. 43.3 षटकांमध्ये श्रीलंका संघ 209 धावांवर सर्वबाद झाला.
श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी मैदानात पावसाने आणि जोरदार वाऱ्यांनी हजेरी लावली. अशात स्टेडियमच्या झताला लावलेले आयसीसी विश्वचषकाचे होर्डिंग खाली स्टँड्समध्ये येऊन पडले. सुदैवाने हौर्डिंग स्टॅन्डसमध्ये पडलेल्या जागी कोणताही चाहता बसला नव्हता. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
Scary scenes at Ekana Stadium, Lucknow.
Hoardings are falling and fans running for cover. #AUSvSL #AUSvsSL
????/Atnomani pic.twitter.com/7kwVsSbMn0— Ishan Joshi (@ishanjoshii) October 16, 2023
Hoardings falling off the Ekana Stadium roof during #AUSvsSL Luckily no casualties pic.twitter.com/2tGDSKmg2c
— Aparajita (@culesme) October 16, 2023
लाईव्ह सामन्यात हा प्रकार घडल्यानंतर स्टेडियमध्ये चाहत्यांना वरच्या बाजून जाऊन बसण्याच्या सुचना केल्या गेल्या. वाऱ्यांमुळे अजून एखादे होर्डिंग खाली पडले असते, तर स्टॅन्डमध्ये खाली बसलेल्या चाहत्यांना इजा पोहोचू शकत होती. (Scary scenes at Ekana Stadium, Lucknow. Hoardings are falling and fans running for cover.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, ऍडम झम्पा
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश थीक्षणा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
सुपर स्टार्क! आजवरच्या इतिहासात कोणालाही न जमलेली कामगिरी दाखवली करून, 21 सामन्यात…
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा