---Advertisement---

पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा

---Advertisement---

मुंबई | विंडीज संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा झाली असुन आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यात २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

या दौऱ्याची सुरुवात ४ ऑक्टोबरला राजकोट कसोटी सामन्याने होणार असुन शेवटचा टी२० सामना ११ नोव्हेंबरला चेन्नईला होणार आहे.

५ वन-डे सामन्यांपैकी २ सामने महाराष्ट्रात होणार आहेत. त्यातील तिसरा वन-डे सामना २७ ऑक्टोबरला पुण्याला तर चौथा वन-डे सामना २९ ऑक्टोबरला मुंबईला होणार आहे. 

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असुन हा दौरा ११ सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर १५ ते २८ सप्टेंबर या काळात भारतीय संघ युएसएला एशिया कपमध्ये भाग घेईल. त्यानंतर एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर संघ राजकोटला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

असे आहे विंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक-

कसोटी मालिका-

पहिली कसोटी- ४ ते ८ ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)

दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)

वन-डे मालिका-

पहिला वन-डे सामना- २१ ऑक्टोबर (बारसपारा स्टेडियम, गुवाहटी)

दुसरा वन-डे सामना- २४ ऑक्टोबर (होळकर स्टेडियम,इंदोर)

तिसरा वन-डे सामना- २७ ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे)

चौथा वन-डे सामना- २९ ऑक्टोबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

पाचवा वन-डे सामना- १ नोव्हेंर (ग्रिनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम)

टी-२० मालिका-

पहिला टी-२० सामना- ४ नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)

दुसरा टी-२० सामना- ६ नोव्हेंबर (कानपूर किंवा लखनऊ)

तिसरा टी-२० सामना- ११ नोव्हेंबर (चेपॉक स्टेडियम, चेन्नई)

महत्त्वाच्या बातम्या-

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment