न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार स्कॉट स्टायरिशने एक मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्याने श्रेयस अय्यरला भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार, असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आता स्टायरिशने अजून एक खुलासा केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर त्याचा फोन सतत वाजत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्टॉक स्टायरिश (Scott Styris) म्हटला होता की, “जस श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शॉर्ट चेंडूची अडचण दूर केली, तर भविष्यात तो भारताच्या कर्णधारपदाचा दावेदार असेल. श्रेयस अय्यरविषयी मला प्रत्यक्षात जी गोष्ट आवडते ती, म्हणजे नेतृत्वाचे गुण, जे त्याच्याकडे आहेत. मला वाटते की, तो भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडू शकतो. याच कारणास्तव मी त्याला संघात पाहू इच्छितो आणि या संघात त्याला जास्तीत जास्त संधी मिळेल, अशी अपेक्षा करतो.” भारतीय संघाचा माजी दिग्गज सुरेश रैना देखील त्याच्या कारकिर्दीत अनेकदा शॉर्ट चेंडूवर बाद झाला आहे. स्टायरीशनेही रैनाच्या या कमतरतेचा उल्लेख केला.
जेव्हापासून स्टायरिशने श्रेयस अय्यरविषयी ही प्रतिक्रिया दिली आहे, तेव्हापासून त्याचा फोन सतत वाजत आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्टायरिश म्हणाला की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या फोनमध्ये मॅन्यूअल गुगल अलर्ट आहे. श्रेयस अय्यरविषयी काही दिवसांपूर्वी मी जे बोललो होतो, त्या वक्तव्यामुळे माझा फोन सतत वाजत आहे.”
दरम्यान, मागच्या वर्षी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून नावारूपाला येत होता. पंरतु अचानकपणे त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मोठी विश्रांतीही घ्यावी लागली. श्रेयसने आता संघात पुनरागमन केले असले तरी, त्याला अलिकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये.
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यात आहे आणि श्रेयस अय्यर देखील संघासोबत या दौऱ्यात सहभागी आहे. उभय संघातील एकदिवसीया मालिकेत मात्र श्रेयसने चांगले प्रदर्शन केले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेत श्रेयसने ५४ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात ६३ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरला घ्यायचीये विराटची जागा! स्वत:च व्यक्त केली इच्छा
भारताचा आणखी एक गोलंदाज काऊंटी क्रिकेटमध्ये घालतोय धुमाकूळ!