गतवर्षी आपल्या जिवाची पर्वा न करत आपल्या मित्रांना आणि दिग्गज फुटबॉलपटू मेसुट ओजिलला चोरांपासून वाचवणाऱ्या फुटबॉलपटू सीड कोलासनिक याची पत्नि बेला हिला ब्रिटेनच्या विमानतळावर स्टेन गनसोबत पकडले गेले आहे. Sead Kolasinac Wife Bella Got With Gun In Her Bag
झाले असे की, २७ वर्षीय बेलाने गतवर्षी आपल्या पती सीड आणि मित्र ओजिलवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी स्वत:कडे एक स्टेन गन ठेवू लागली होती. मात्र, तिने काही दिवसांपुर्वी ब्रिटेनमध्ये प्रवेश करताना स्टेन गन सोबत घेतली होती. बॉर्डर फोर्स ऑफिसर्सना तपासणीदरम्यान तिच्या बॅगमध्ये गन सापडली. मुळात, ब्रिटनमध्ये स्टेन गनचा वापर करण्यास बंदी आहे.
त्यामुळे बेलाला ६ महिन्यांसाठी कारागृहाची (जेल) हवा खावी लागू शकते. मात्र, तिच्या प्रवक्ताने म्हटले आहे की, “हा सर्व गैरसमज आहे. बेलाकडे स्टेन गन होती. पण ती पूर्णपणे पॅक केलेली होती आणि त्याच्यामध्ये बॅटरीसुद्धा नव्हती.”
“बेलाकडे तिने विमान ऑपरेटरला पाठवलेले ई-मेल पुराव्यासाठी आहेत. या मेलमध्ये तिने ऑपरेटरकडून गन नेण्याची परवानगी घेतली होती. मात्र, दुर्दैवाने प्रत्यूत्तर येईपर्यंत तिचा फोन स्विच ऑफ केला गेेलेला होता. त्यामुळे विमान उतरण्यापुर्वी तिला विमान एअरलाइनकडून आश्चर्याचा धक्का बसला.”
सीड आर्सेनल फुटबॉल संघाचा डिफेंडर आहे. त्याने आतापर्यंत २ गोल केले आहेत. शिवाय त्याच्या संघाने आतापर्यंत ३४ सामने जिंकले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
थोडी वाट पहा, टीम इंडियात होऊ शकते सेहवागचे पदार्पण
जडेजा, विराट नाही तर टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक
क्रिकेटमधील ‘ही’ गोष्ट आमच्यासाठी असेल सर्वात कठीण काम