क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या दहाव्या दिवशी नंदुरबार हिमालयन ताहर्स, नांदेड चांबल चॅलेंजर्स, रत्नागिरी अरावली ॲरोज व ठाणे हम्पी हिरोज संघानी प्रतिस्पर्धी संघाला नमवत विजय प्राप्त केला. पहिला सामना सोडला तर बाकी सर्व लढती चांगल्या चुरशीच्या झाल्या.
नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाने धुळे चोला वीरांस संघावर 43-30 असा विजय संपादन केला. दोन्ही संघांनी पहिले दोन्ही सामने गमावले असल्याने दोन्ही संघाना विजय आवश्यक होता. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने 16 गुण तर श्रेयस उंबरदंड ने हाय फाय पूर्ण केला. धुळे संघाकडून मितेश कदम ने 15 गुण तर नरेंद्र खेर ने 6 पकडीत गुण मिळवले.
दुसरा सामना अत्यंत चुरशीचा झाला नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने अटीतटीच्या लढतीत नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाचा 41-38 असा पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. नांदेड संघाकडून अक्षय सूर्यवंशी व अजित चव्हाण ने सुपर टेन करत महत्वाची भूमिका निभावली. नाशिक कडून ऋषिकेश गडाख ने चांगला खेळ केला. तिसऱ्या सामन्यात रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने परभणी पांचाला प्राईड संघावर 41-32 अशी मात देत दुसरा विजय मिळवला. रत्नागिरीच्या वेद पाटील ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत आपली छाप पाडली. त्याला साईराज कुंभार व भूषण गुढेकर ने चांगली साथ दिली. परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष व पंकज राऊत ने चांगला खेळ केला पण ते आपल्या संघाल तिसरा विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
आजच्या शेवटच्या लढतीत ठाणे हम्पी हिरोज संघाने मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. ठाणे संघाने 37-35 असा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थान वर झेप घेतली. ठाणे कडून विघ्नेश चौधरी, चिन्मय गुरव व अहमद इनामदार यांनी चांगला खेळ केला. तर मुंबई शहराच्या जतिन विंदे व साई चौगुले यांचे प्रयत्न कमी पडले. (Second consecutive win for Thane Hampi Heroes and Nanded Chambal Challengers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा सर्वोत्तम फिनिशर! रिंकू सिंगने डेविड मिलरसह धोनीचा मोठा विक्रमही मोडला
सीएसकेमुळे आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची वाचलीये कारकीर्द, करियर संपल्याचे बोलले जात असलेल्यांना धोनीने दिली संधी