पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झाला. नाशिक संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले असल्या कारणाने त्याना आपली क्रमवारी सुधारण्यासाठी विजय आवश्यक होतं. काल मिळवलेल्या विजयाने पुणे संघाचा आत्मविश्वास वाढला होता.
पुणे संघाने आक्रमक खेळ करत पहिल्या 4 मिनिटामध्ये नाशिक संघाला ऑल आऊट करत 9-0 अशी आघाडी पुणे संघाने घेतली. त्याला तोडीसतोड उत्तर नाशिक संघाने देत पुढील 3 मिनिटांमध्येच नाशिक संघाने पुणे संघाला ऑल आऊट करत सामना 9-9 असा बरोबरीत आणला. ही कामगिरी करण्यासाठी पुणे कडून भूषण तपकीर ने तर नाशिक कडून ईश्वर पठाडे ने महत्वपूर्ण भूमिका निभावली.
मध्यांतरला 22-15 अशी आघाडी पुणे संघाकडे होती. त्यानंतर पुणे संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. मध्यांतर नंतर ही दोन्ही संघांनी एकमेकांना वर लोन पाडले मात्र पुणे संघाने अखेर पर्यत आपली आघाडी सोडली नाही.
पुणे संघाने 43-34 असा विजय मिळवत चौथ्या स्थानावर झेप घेतली. तर नाशिक संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. भूषण तपकीर ने चढाईत 16 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्याला आर्यन राठोड ने चांगली साथ दिली. तर पकडीत योगेश अक्षुमनाने हाय फाय पूर्ण केला. नाशिक संघाकडून ईश्वर पठाडे ने सुपर टेन पूर्ण केला. पावन भोर व शिवकुमार बोरगोडे ने अष्टपैलू खेळ केला मात्र त्याना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. (Second win for Pune Palani Tuskers in the promotion round)
बेस्ट रेडर- भूषण तपकीर, पुणे पलानी टस्कर्स
बेस्ट डिफेंडर- योगेश अक्षुमनी, पुणे पलानी टस्कर्स
कबड्डी का कमाल- ईश्वर पठाडे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
W W W W : कोच नेहराचा संदेश अन् श्वास रोखायला भाग पाडणारी लास्ट ओव्हर, मोहितकडून लखनऊची फलंदाजी उद्ध्वस्त
प्रमोशन फेरीत नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाचा पहिला विजय, मुंबई शहरच विजयी रथ रोखला