---Advertisement---

नजर हटी दुर्घटना घटी! अश्विनचा चेंडू सोडणे फलंदाजाला पडले महागात, झाला बोल्ड

On: सोमवार, जुलै 12, 2021 9:04 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. संघातील सर्वच खेळाडू सध्या मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन हा काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेतील आश्विनचा एक चेंडू सोडणे फलंदाजाला महाग पडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी आर अश्विन काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळून आपल्या गोलंदाजीला धार लावण्यात व्यस्त आहे. अश्विन सध्या सर्रे संघाकडून खेळत आहे. त्याने समरसेट संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात असा काही चेंडू टाकला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगू रंगली आहे. (See how r Ashwin spin bowling confused England batsman and clean him Bowled)

भल्याभल्या दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणाऱ्या अश्विनने पहिल्याच दिवशी टॉम लेमनबॉयला असा काही चेंडू टाकला जो त्याला कळालाच नाही. टॉम लेमनबॉय समरसेट संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत असताना अश्विन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यात मास्टर असणाऱ्या अश्विनने त्याला ऑफ साईडच्या दिशेने बाहेर चेंडू टाकला. फलंदाजाला वाटले की, तो चेंडू ऑफ स्पिन होऊन बाहेर निघेल. परंतु तोच चेंडू आतल्या दिशेने आला आणि फलंदाजाची दांडी उडवून गेला.

https://twitter.com/surreycricket/status/1414208502252376068?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1414208502252376068%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fsomerset-vs-surrey-watch-how-ravichandran-ashwin-spin-confused-england-batsman-and-clean-him-bowled-4805266%2F

टॉम लेमनबॉयने या सामन्यात ८९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तसेच या सामन्यात सर्रे संघाने अश्विनला पहिलेच षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली होती. २०१० नंतर हे पहिल्यांदाच झाले आहे की, इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत कुठल्या फिरकीपटूने डावाची सुरुवात केली. अश्विनसाठी ही मालिका सराव मालिका असणार आहे. कारण येत्या काही दिवसातच भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हिशोब बरोबर! शेफालीने घेतला सूड, शून्यावर बाद करणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला मारले सलग ५ चौकार

क्या बात!! भारतीय वंशाच्या अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीने पटकावले विम्बल्डन ज्युनियरचे जेतेपद

‘तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?’, त्यावेळी सेहवागने फलंदाजी करतानाच शोएब अख्तरला केले होते गपगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---