कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरातील क्रिकेटचे सामने स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. अशामध्ये जास्तीत जास्त क्रिकेटपटू सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. हे पाहता आयसीसीकडून सांगण्यात आले होते की, बुकी सोशल मीडियामार्फत खेळाडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात.
आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी पथकाने म्हणजेच एसीयूचे मुख्य ऍलेक्स मार्शल (Alex Marshall) यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्यासाठी सांगितले आहे. परंतु बीसीसीआय याबाबतीत अधिक चिंतेत नसल्याचे दिसते.
बीसीसीआयचे एसीयूचे मुख्य अधिकारी अजित सिंग (Ajit Singh) यांनी सांगितले की, “त्यांना आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमच्या खेळाडूंना चांगल्याप्रकारे समजावून सांगितले आहे की, बुकी किंवा अशाप्रकारची कामे करणारे लोक कशाप्रकारे तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तसेच सोशल मीडियामार्फत त्यांचे काम करण्याची पद्धतीबद्दलही सांगितले आहे.”
“आम्ही आमच्या खेळाडूंना सावध केले आहे की, ते (बुकी) तुमच्याशी अशाप्रकारे संपर्क साधतील जसे की ते तुमचे चाहते आहेत. तसेच ते तुमच्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत भेटण्याचाही प्रयत्न करू शकतात,” असेही अजित पुढे म्हणाले.
खेळाडूंना सावध करत अजित म्हणाले की, “जर असे काहीही झाले तर अधिकाधिक खेळाडू लगेच आम्हाला कळवतात की कोणीतरी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.”
अजित यांना यावेळी असेही विचारण्यात आले की, अधिकाधिक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय असतात. तर बीसीसीआयची (BCCI) एसीयू टीम त्यांच्या ऑनलाईन कंटेंटवरही लक्ष देते का?
यावर प्रत्युत्तर देत अजित म्हणाले की, “ज्या खेळाडूंवर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल तेवढे लक्ष ठेवले जाते. तरीही लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान त्या गोष्टीच्या सत्यतेची पडताळणी करणे शक्य नाही. तसंही आमच्या पाहण्यात काही आले तर ते आमच्या डेटा बेसमध्ये सेव्ह होते. तसेच लॉकडाऊन जेव्हा संपेल आणि याची गरज पडेल तेव्हा आम्ही स्वत: याची सत्यता तपासू.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-ज्या वर्षी खेळाडू अंडर १९ खेळतात तेव्हा या ५ खेळाडूंनी कसोटीत केले होते कारनामे
-१७ वर्षांपुर्वी इरफानला पाकिस्तानचा तो खेळाडू असं काही वाईट बोलला होता की आजही…
-झिरो नशिबात येण्यापुर्वी सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज