---Advertisement---

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

On: रविवार, एप्रिल 11, 2021 12:20 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान संपन्न झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर सात गड्यांनी मात करत हंगामाची विजयी सुरुवात केली. त्याचवेळी, या सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने चेन्नईच्या संघाबाबत एक गमतीदार मीम शेअर केला.

सेहवागने केले गमतीदार ट्विट
भारतीय संघाचा माजी सलामीवीर राहिलेला वीरेंद्र सेहवाग हा आपल्या मजेदार ट्विटसाठी ओळखला जातो. सेहवाग सातत्याने क्रिकेट व इतरही गोष्‍टींविषयी ट्विट करत असतो. त्याने आज (१० एप्रिल) खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या आयपीएलच्या सामन्यावेळीही ट्विट केले. सेहवागने एक मीम शेअर केले ज्यामध्ये लिहिले होते, ‘काय करायचे, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही.’

सोबतच त्याने या मीमला कॅप्शन देत लिहिले. ‘चेन्नई सुपर किंग्सची बॅटिंग लाईनअप पाहा. ब्राव्हो, लॉर्ड शार्दुल व दीपक चहर ९, १० आणि ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहेत.’ चेन्नई सुपर किंग्सने या पहिल्या सामन्यात जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूंना आपल्या अंतिम अकरामध्ये स्थान दिले होते.

चेन्नईचा पहिला सामन्यात पराभव
मागील हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची या हंगामात विजयी सुरुवात झाली नाही. सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने अर्धशतक झळकावले. त्याला मोईन अली, सॅम करन व रवींद्र जडेजा यांनी उपयुक्त खेळ्या करत चांगली साथ दिली. या जोरावर चेन्नईने १८८ धावा धावा धावफलकावर लावल्या.

प्रत्युत्तरात, शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दिल्लीसाठी १३.३ षटकात १३८ धावांची सलामी देत सामना दिल्लीच्या बाजूने झुकविला. धवनने ८५ तर, शॉने ७२ धावांची खेळी केली. कर्णधार रिषभ पंतने नाबाद १५ धावा बनवत संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---