---Advertisement---

‘…म्हणून, सूर्यकुमारला भारतीय संघात जागा नाही’, निवडकर्त्याचा मोठा खुलासा

On: रविवार, नोव्हेंबर 22, 2020 3:09 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या दरम्यान आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली. आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या सूर्यकुमार यादवची मर्यादित षटकांच्या संघात निवड होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. मात्र, दुर्देवाने सूर्यकुमारची एकाही संघात निवड होऊ शकली नाही. सूर्यकुमारला डावलले गेल्यानंतर, निवडसमितीवर टीकेची झोड उठली होती. आता जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर, निवडसमितीने सूर्यकुमारची निवड न होण्यामागील कारण सांगितले आहे.

निवडसमिती सदस्य देवांग गांधी यांनी दिले स्पष्टीकरण

पूर्व विभागाकडून भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचे सदस्य असलेले देवांग गांधी यांनी सूर्यकुमारची निवड न होण्यामागील कारण सांगितले आहे. गांधी यांनी सूर्यकुमारविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, “सूर्यकुमारला डावलण्याचे कारण त्याचा फॉर्म नाही, तर भारतीय संघाकडे आधीपासूनच अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. एका स्थानासाठी भारतीय संघाकडे चार पर्याय उपलब्ध आहेत. त्या सर्वांची कामगिरी देखील उत्तम आहे. सूर्यकुमारला संधी द्यायची झाली तर कोणाला वगळावे ?”

सूर्यकुमारने संयम बाळगावा

भारताचे माजी खेळाडू असलेल्या गांधी यांनी पुढे म्हटले, “राष्ट्रीय संघ निवडायचा म्हटल्यास, या गोष्टी होत राहतात. सूर्यकुमार दर्जेदार खेळाडू आहे यात शंका नाही. त्याला थोडा संयम बाळगावा लागेल. त्याला लवकरच संधी मिळू शकते. त्याने अशीच कामगिरी सातत्याने करत रहावी. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्‍याने धावा जमवल्यानंतरच खेळाडूंना राष्ट्रीय संघात जागा मिळण्याची शक्यता वाढते. मयंक अगरवाल याचे उत्तम उदाहरण आहे.”

आयपीएलमध्ये सूर्यकुमारने केली होती चमकदार कामगिरी

नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली होती. सूर्यकुमारने स्पर्धेत १६ सामने खेळत ४०.१० च्या‌ अप्रतिम सरासरीने ४८० धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४५ इतका लाजवाब होता. सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नसल्याचे वृत्त आल्यावर; ट्विटरवर #JusticeForSKY ही मोहीम राबवली गेलेली.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा

“मी निराशेतून लवकर बाहेर येईल आणि…”, भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमारने रोहितशी केली चर्चा

…म्हणून मुंबईच्या प्रशिक्षकाला नकोय ‘मेगा ऑक्शन’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---