खेळ ही एक अशी गोष्ट आहे जे जगभरातील सर्वच लोकांना एकत्र आणते, असं म्हटलं जातं, त्याचबरोबर खेळामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. परंतु, सध्या सुरू असलेल्या टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये अशी एक घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसेल. ही घडलेली घटना वंशवाद संदर्भातील आहे.
ज्येष्ठ पत्रकार दिमोस्थेनिस करमिरिस यांनी ग्रीक टीव्ही चॅनल ‘ईआरटी’ वर वंशद्वेषपूर्ण भाष्य केले आहे, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्याचे झाले असे की, टीव्हीवर एका कार्यक्रमाच्या दरम्यान पाहुणे म्हणून कारमीरिस दिसून आले होते. याच दरम्यान त्यांनी दक्षिण कोरियाच्या टेबल टेनिसपटूंवर चुकीची टिप्पणी केली.
खरंतर टेबल टेनिस पुरुषांच्या एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जियांग यंग-सिकने ग्रीसचा खेळाडू पॅनगिओटिस जियोनिसचा ४-३ ने पराभव केला. या सामन्यानंतर दिमोस्थेनेस कॅरमिरिसचे धक्कादायक विधान समोर आले. जेव्हा ज्येष्ठ पत्रकार दिमोस्थेनिस करमिरिस यांना दक्षिण कोरियन खेळाडू जियांग यंग-सिकच्या खेळाच्या शैलीबद्दल विचारले असता त्याने सर्वांचं आश्चर्य वाटेल असे उत्तर दिले.
ते म्हणाले की, ‘दक्षिण कोरियन खेळाडू टेनिस खेळत नाहीत. कारण त्यांचे डोळे इतके लहान आहेत की ते बॉल मागे व पुढे जाताना कसे काय बघतात हे मला कळत नाही.’ हे विधान करत कारमिरिस लाईव्ह कार्यक्रमात हसू लागले. करमिरिस यांनी केलं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोक त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. परिस्थिती गंभीर होत चाललेली पाहून ईआरटीने कारमिरीसल निलंबित करण्यात आले आहे.
ग्रीसच्या चॅनल ईआरटीने एक निवेदन जारी केले आहे की, ‘वंशवादी वक्तव्याला सार्वजनिक दूरदर्शनवर स्थान नाही. ईआरटी आणि दिमोस्थेनिस करमिरिस यांच्यातील करार आज संपणार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
बटरफ्लाय हीट- २ मध्ये दुसरा क्रमांक पटकावूनही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात साजन प्रकाश अपयशी
Video: मॅट पार्कीसनची पुन्हा एकदा कमाल, तब्बल ११ अंशानी चेंडू वळवत यष्ट्या केल्या उद्ध्वस्त