---Advertisement---

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पोर्तुगालच्या जाओ सौसाचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 10:33 PM
---Advertisement---

पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या वतीने आयोजित व टाटा ग्रुप तर्फे प्रायोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ च्या दुसऱ्या फेरीत पोर्तुगालच्या जाओ सौसाने तिसऱ्या मानांकित इटलीच्या जियानलुका माजेरवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 137व्या स्थानी असलेल्या पोर्तुगालच्या जाओ सौसाने जागतिक क्र.67असलेल्या इटलीच्या जियानलुका माजेरचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-3, 7-6(7-4) असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. हा सामना 2तास 13मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये माजेरने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये जाओची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये माजेरने वर्चस्व राखत आपली सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या जाओने आक्रमक खेळ करत सहाव्या गेममध्ये माजेरची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये जाओने वरचढ खेळ करत हा सेट 7-6(7-4) असा जिंकून विजय मिळवला.

अन्य लढतीत जागतिक क्रमवारीत 95व्या स्थानी असलेल्या पोलंडच्या कॅमिल माझरेखने जागतिक क्र.141फ्रांसच्या क्विंटिन हिलयासचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(9-7) असा पराभव करून आगेकूच केली. जागतिक क्र.85जर्मनीच्या पाचव्या मानांकित डॅनियल अल्तामेर याने जागतिक क्र.108मॉलदोव्हच्या राडू अलबोटचा 3-6, 6-4, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला.

दुहेरीत पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर एरलेरने चेक प्रजासत्ताकच्या जेरी व्हेसलीच्या साथीत फ्रांसच्या हुगो ग्रेनेर व क्विंटिन हिलीयसयांचा 7-6(0), 6-4 असा पराभव करून दुसरया फेरीत धडक मारली.

एकेरी: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी):
डॅनियल अल्तामेर(जर्मनी)[5]वि.वि.राडू अलबोट(मॉलदोव्ह)3-6, 6-4, 6-4;
कॅमिल माझरेख(पोलंड)वि.वि.क्विंटिन हिलयास(फ्रांस) 6-3, 7-6(9-7);
जाओ सौसा(पोर्तुगाल)वि.वि.जियानलुका माजेर(इटली)[3] 4-6, 6-3, 7-6(7-4);

दुहेरी गट: पहिली फेरी:
अलेक्झांडर एरलेर(ऑस्ट्रिया)/जेरी व्हेसली(चेक प्रजासत्ताक)वि.वि.हुगो ग्रेनेर(फ्रांस)/क्विंटिन हिलीयस(फ्रांस)7-6(0), 6-4.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---