पॅरिस। फ्रेंच ओपन २०२० स्पर्धेतून २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सने माघार घेतली आहे. ती आज (बुधवार, ३० सप्टेंबर) त्सेताना पिरोन्कोवाविरुद्ध दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार होती. परंतु तिने त्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिने हा निर्णय टाचेच्या दुखापतीमुळे घेतला आहे.
यावर्षी फ्रेंच ओपनच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून सेरेनाकडे पाहिले जात होते. ती देखील कारकिर्दीतील २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्यास उत्सुक होती. परंतु युएस ओपन दरम्यान झालेल्या दुखापतीतून ती पूर्णपणे सावरली नसल्याने अखेर तिने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. यावेळी तिने तिला चालतानाही त्रास होत असल्याचे सांगितले.
सेरेनाने सोमवारी फ्रेंच ओपनची पहिली फेरी जिंकली होती. तिने ख्रिस्ती ऍनविरुद्ध पहिल्या फेरीत ६-७(२-७) ०-६ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता.
सेरेनाने आत्तापर्यंत ३ वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.