---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे नाराज; म्हणाला, ‘माफ करा, पराभवाची जबाबदारी…’

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 12:34 PM
Pakistan Cricket Team
---Advertisement---

रविवारी (11 सप्टेंबर) श्रीलंका संघाने पाकिस्तानचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळवले. श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या सर्वच सामन्यात फॉर्मात दिसला आणि अंतिम सामन्यात देखील त्यांचा हाच फॉर्म कायम राहिला. दुसरीकडे पाकिस्तान सुरुवातीपासूनच विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार होता, परंतु अंतिम सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेकडून पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आता त्यांचा उपकर्णधार शादाब खान याने पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.  

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या डावातील 17 व्या षटकात शादाब खान (Shadab Khan) याने सीमारेषेजवल एक महत्वाचा झेल सोडला. श्रीलंकन संघासाठी भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) वादळी खेळी करत असताना शादबने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर 19 व्या षटकात शादाबने आसिफ अली याला धडक दिल्यामुळे राजपक्षेचा अजून एक झेल सोडला. पाकिस्तानी खेळाडूंनी दोन जीवनदान दिल्यानंतर राजपक्षेने या सामन्यात 45 चेंडूत 71 धावा कुटल्या. त्याच्या या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर श्रीलंकने 170 धावाचे आव्हान उभे केले.

श्रीलंकेकडून या महत्वाच्या सामन्यात मिळालेल्या परभवानंतर शादाब खानने अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “झेल पकडले तर सामना जिंकता येतो. माफ करा, मी या पराभवाची जबाबदारी घेतो. मी माझ्या संघाला निराश केले आहे. संघासाठी नसीम शाह, हॅरिस रउफ आणि मोहम्मद नवाज यांच्यासह संपूर्ण गोलंदाजी आक्रमणाने चांगली कामगिर केली. मोहम्मद रिजवानने खूप संघर्ष केला. संघाने त्यांच्या परिने पूर्ण प्रयत्न केला. श्रीलंका संघाचे आभिनंदन.”

उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तान प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकन  संघाच्या धावांवर लगाम लावू शकला नाही. मर्यादिक 20 षटकांमध्ये श्रीलंकेने 6 विकेट्सच्या नुकसानावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला मात्र हे लक्ष्य गाठता आले नाही. श्रीलंकने हा सामना 23 धावांनी जिंकून आशिया चषकाच्या इतिहासातील त्यांची सहावी ट्रॉफी जिंकली. यापूर्वी त्यांना पाच वेळा ही मानाची ट्रॉफी जिंकली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेला विजयाच्या ‘वीरू स्टाईल’ शुभेच्छा; पाकिस्तानलाही मारला टोमणा
पीसीबी अध्यक्षांना पराभव बोचला! भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन; पाहा व्हिडिओ
पाकिस्तानचं स्वप्न हिरावून घेणारी हसरंगाची 17वी ओव्हर, नेमकं काय घडलं?   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---