गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या देशात हीरो म्हणून नावारुपाला येत आहे. कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीच्या संकटमय काळात आफ्रिदी लोकांची मदत करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आफ्रिदीने भाषण दिले आहे.
यावरुन कळून येते की, तो तेथील लोकांची मने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. ज्याप्रकारे, पाकिस्तानला विश्वविजेत्या बनवणाऱ्या कर्णधार इम्रान खानने राजकारणात प्रवेश मिळवला होता, अगदी तोच मार्ग अवलंबल्यामुळे आफ्रिदीही राजकारणात उतरणार अशी चर्चा चालू आहे. Shahid Afridi Following Footstep Of Imran Khan Is To Be Next Prime Minister Of Pakistan
२०१६मध्ये आफ्रिदीने पहिल्यांदा राजकारणात उतरण्याची इच्छा प्रकट केली होती. तो म्हणाला होता की, “त्याला राजकारणी बनून लोकांची सेवा करायची आहे. शिवाय, माझ्या शुभचिंतकांनाही वाटते की, मी राजकारणात उतरावे. राजनेता हा जनतेचा सेवक असतो आणि तो लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतो.”
जर इम्रान खान आणि शाहिद आफ्रिदीची क्रिकेट मैदानावरील तुलना करायची झाली. तर, दोघेही पाकिस्तानचे दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू होते. त्यांच्यामध्ये पराभूत होत असलेला सामना जिंकून देण्याची क्षमता होती. शिवाय, मैदानाबाहेरील त्यांचे जीवनही खूप रोमांचक राहिले. मग त्यांची लव्ह लाइफ असो किंवा त्यांचे अफेयर्स असो. आज कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू या दोघांच्याही मैदानावरील आणि मैदानाबाहेरील जिवनाची बरोबरी करु शकत नाही.
इम्रान खानने राजकारणाची सुरुवात समाज सेवेने केली होती. त्याने पाकिस्तानमध्ये शिक्षणापासून ते स्वास्थापर्यंत सर्व गरजेच्या गोष्टींच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याप्रमाणेच, आफ्रिदीही कोरोना व्हायरसने पिडीत लोकांची मदत करत आहे. लोकांच्या घरी जाऊन त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवत आहे. तसेच, आफ्रिदीची फाउंडेशन लोकांना सॅनिटायर वाटण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्याने लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच काही दिवसांपुर्वी आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे फक्त पाकिस्तानमधील चाहते नव्हे तर जगभरातील चाहतेही त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. यावरुन ही गोष्ट स्पष्ट होते की, आफ्रिदीने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.
तसेच, पठाण असल्यामुळे इम्रान खानला पाकिस्तानच्या कराचीपासून ते पेशावर आणि लाहोरपर्यंत लोक पसंती दाखवत होते. आफ्रिदीलाही त्याच्या पठाण असण्याचा फायदा होत आहे. कारण, पाकिस्तानमध्ये पठाण लोकांची खूप जास्त संख्या आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणत्याही नेत्याच्या जय किंवा पराजयासाठी ‘पठाण फॅक्टर’ खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो.
काही दिवसांपुर्वी मेजर जनरल गफूर आणि आफ्रिदीची एकमेकांना गळाभेट घेतानाची फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे ज्याप्रकारे इम्रान खानने क्रिकेटमधील निवृत्तीनंतर राजकारणाची सुरुवात केली. त्याप्रमाणे आफ्रिदीही पुढे जाऊन पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकतो, अशी चर्चा होत होती. त्यावेळी ट्विटरवर #afridiforPM असा हॅशटॅगही ट्रेंड होत होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
अंगात १०४ डिग्री ताप असताना ‘या’ माजी कर्णधाराच्या दबावामुळे मुरली कार्तिक खेळला होता थेट सामना
एकाच सिरीजमध्ये सचिनला ३ वेळा तंबूत पाठवणारा खेळाडू झालाय मेकॅनिक,…
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पहा कसे