भारतीय संघ 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी साठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आश्या स्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शहिद आफ्रिदीने विराट कोहलीबाबत प्रतिक्रिया दिला आहे. तो म्हणाला, जर टीम इंडियासोबत विराट कोहली चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी पाकिस्तानात आला तर तो भारताच्या आदरतिर्थ्याला विसरुन जाईल कारण पाकिस्तानमध्ये विराटचे खूप चाहते आहेत. तसेच दोन्ही देशांमधील कठीण राजकीय संबंध बाजूला ठेवून भारताने पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी नक्की यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आफ्रिदीने एका यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले की, मी पाकिस्तानमध्ये भारतीय संघाचे कौतुक करतो आणि त्यांनी यावे. आमच्या भारत दौऱ्यात आम्हाला खूप आदर आणि प्रेम मिळते. तसेच भारतीय संघाला 2005 च्या पाकिस्तान दौऱ्यातही पाकिस्तानात असेच प्रेम मिळाले होते. माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाले की, क्रिकेट दौऱ्यांना राजकीय संबंधांपासून वेगळे ठेवले पाहिजे. भारत आणि पाकिस्तान आपापल्या देशात एकमेकांविरुद्ध खेळतात यापेक्षा मोठे राजकारण नाही.
Shahid Afridi said, “Virat has lots of fans in Pakistan, we’re eager to see Virat play in Pakistan”. pic.twitter.com/hWoDOSrMXr
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) July 11, 2024
विराट कोहली पाकिस्तानात आला तर त्याला भारतात मिळालेले प्रेम विसरून जाईल, असे तो म्हणाला. पाकिस्तानमध्ये कोहलीची खूप क्रेझ आहे. आणि आमच्या लोकांना तो खूप आवडतो. खरं तर तो माझा देखील आवडता खेळाडू आहे. त्याचा खूप मोठा फॅनबेस आहे. माझ्या तो टी20 मधून एवढ्या लवकर निवृत्त व्हायला नको होते, कारण त्यांच्यामुळे टी20 क्रिकेटला शोभा होती. तसेच संघातील युवा खेळाडूंना त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
वृत्त अहवालानुसार आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी हायर्बीड पध्दतीने होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याची भूमिकेत आहे. अश्या परिस्थितीत बीसीसीआयने आयसीसीकडे विशेष प्रस्ताव दिले आहे. जर असे झाल्यास टीम इंडिया श्रीलंका किंवा दुबई मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी खेळेल.
महत्तवाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची घोषणा, कर्णधाराने सोडलं नेतृत्व, संघाला मोठा धक्का
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ का नाही जाणार पाकिस्तानमध्ये? पाहा नेमकं कारण..