इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सध्या जगातील सर्वात लोकप्रिय आणि महागडी क्रिकेट लीग आहे. नुकतेच बीसीसीआयने आयलीएचे मीडिया राईट्स ४३,३९० कोटी रुपयांमध्ये विकले आहे. या बातमीनंतर पाकिस्तानमध्ये खळबल माजली आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या गोटातील गोंधळ तेव्हा अधिक वाढला, जेव्हा बीसीसीआय सचिव जय शहांनी सांगितले की, आयसीसीच्या वार्षीक वेळापत्रकात आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा वेळ दिला जाईल. आता याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएलला आयसीसीच्या वार्षिक नियोजनात वेळ मिळणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व मोठ्या क्रिकेटपटूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. परंतु पाकिस्तानी खेळाडूंना मात्र या निर्णयाचा काडीचा फायदा होणार नाहीये. दुसरीकडे पाकिस्तानच्या द्विपक्षीय मालिकांवर देखील यामुळे परिणाम होईल. याच कारणास्तव शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) पाकिस्तानी संघाला भविष्यात होणाऱ्या नुकसानासाठी आधीच तयार दिसत आहे.
जय शहा (Jay Shah) जे बोलले, त्यावर शाहिद आफ्रिदीला प्रश्न विचारला गेला आणि त्याने देखील मान्य केले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे सध्या वजन आहे. आफ्रिदी असेही म्हणाला की, यामुळे पाकिस्तानला नुकसान होणार आहे. यामुळे मार्केट आणि अर्थव्यवस्था (पाकिस्तानच्या) खाली पडेल. क्रिकेटचा सर्वात मोठा बाजार भारत आहे आणि ते जे म्हणतील तसेच होईल.
काय म्हणाले होते बीसीसीआय सचिव
काही दिवसांपूर्वी जय शहांनी स्पष्ट केले होते की, भविष्यात आयपीएलचा कालावधी अजून वाढणार आहे. २०२७ मध्ये ही स्पर्धा ९४ सामन्यांची होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यामुळे होणाऱ्या परिणामावर शहा म्हणाले की, “हा एक असा परिणाम आहे, ज्यावर आम्ही काम केले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, आयसीसीच्या पुढच्या एफटीपी कॅलेंडरमध्ये आयपीएलसाठी अडीच महिन्यांची अधिकृत विंडो असेल. जेणेकरून सर्व दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना सहभागी होता येईल. आम्ही विविध बोर्ड आणि आयसीसी सोबत देखील याविषयी चर्चा केली आहे.”
दरम्यान आयपीएल स्पर्धा सुरू झाली, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग दिला गेला होता. पण वाढत्या आतंकी घडामोडींमुळे त्यांचा आयपीएलमधील सहभाग नंतर रद्द केला गेला. सध्या जगभारातील सर्व देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आणि अफाट पैसा देखील कमावतात. पण पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र या लीगमध्ये सहभागी होता येत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मयंक अगरवाल ते निखत झरीन, फोटोंमध्ये पाहा कोणी कसा साजरा केला जागतिक योगा दिन
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा