भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांना कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. दोन्ही देसांमध्ये राजकीय आणि क्रिकेटच्या मैदानातील वातावरण नेहमीच तापलेले असते. मात्र, जेव्हा कधी हे संघ आणने सामने असतील, तेव्हा मैदानात प्रेक्षकांची गर्दी असतेच असते. आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांचे क्रिकेट बोर्डात गरमारमीचे वातावरण आहे. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रीदी याने मोठा वादा केला आहे.
पाकिस्तान संघाचे दीर्घ काळ नेतृत्व केलेला शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतो. आफ्रिदी सध्या क्रिकेटच्या मैदानातून दूर असला, तरी आपल्या विधानांमुळे वेळोवेळी चर्चेचा विषय ठरतो. त्याचे असेच एक विधान सध्या चर्चेत आहे. त्याने म्हटल्याप्रमाणे 2005 साली भारत दौऱ्यावर अशताना पाकिस्तान संघावर हल्ला झाला होता. होय, आफ्रिदीने सांगितल्याप्रमाणे बेंगोलर कसोटी जिंकल्यानंतर पाकिस्तन संघाच्या बसवर दगडफेक झाली होती. पाकिस्तानच्या 2005 सालचा भारत दौऱ्याविषयी आफ्रिदी म्हणाला, “तेव्हा आमच्यावर दबाव होता. आम्ही चौकार-षटकार मारत होतो, पण आमच्यासाठी कोणीच टाळ्या देखील वाजवत नव्हतं.”
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. पाकिस्तान वनडे विश्वचषकासाठी भारतात येणार की नाही, याविषयी मागच्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. दोन्ही क्रिकेट बोर्ड आणि स्वतः आयसीसीही याबाबत अद्याप स्पष्टपणे काही सांगू शकले नाहीये. आफ्रिदीच्या मते पाकिस्तानी खेळाडू भाारतात जाण्यास नकार देत आहेत. पण संघाने भारतात जाऊन विजेतेपद पटकावले पाहिजे.
याच पार्श्वभूमीवर आफ्रिदी पुढे म्हणाला, “अब्दुल रज्जाकच्या लक्षात असेल तर, बेंगलोर कसोटी जिंकल्यानंतर आमच्या बसवर दगडफेक झाली होती. दबावन नेहमीच राहतो आणि आपण या दबावाचा आनंद घेतला पाहिजे. खेळाडूंच्या मते पाकिस्तान संघाने भारतात जायला नको. पण मी याच्या विरोधात आहे. मला वाटते आपण तिथे गेलं पाहिजे आणि सामना जिंकला पाहिजे.”
Former Pakistan captain Shahid Afridi reveals stones were thrown on their bus in Bangalore when they won the Test match there.
He still believes Pakistan should travel to India and win the World Cup there. pic.twitter.com/QABZ6tQCLk
— Farid Khan (@_FaridKhan) July 14, 2023
दरम्यान, यावर्षीच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेच बोर्ड भूषवणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पाकिस्तान दौरा करण्यासाठी तयार नाहीये. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेताना बोर्डाने ही भूमिका घेतली असून कुठल्याच अटीवर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असे सांगितले जात आहे. माद्यमांतील वृत्तांनुसार भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नसल्यामुळे यावर्षीचा आशिया चषक हायब्रिड मॉडेलने आयोजित केला जाणार आहे. म्हणजेच भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जाऊ शकतात. असे झाले, तर आगामनी वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तान काय भूमिका घेणार, याविषयी अद्यावर चित्र स्पष्ट झाले नाहीये. वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारतीय संघाकडे आहे. (Shahid Afridi said that there was stone pelting on Pakistan team in India in 2005)
महत्वाच्या बातम्या –
इटलीच्या खेळाडूला नमवत जोकोविचची Wimbledon फायनलमध्ये एन्ट्री, 24व्या Grand Slam किताबावर असेल नजर
भारताने सामना तर जिंकलाच, पण विराटचा डान्सने लुटली सगळी वाहवा; ‘किंग’ कोहलीचे ठुमके वेधतायत लक्ष