---Advertisement---

भारताने सामना तर जिंकलाच, पण विराटचा डान्सने लुटली सगळी वाहवा; ‘किंग’ कोहलीचे ठुमके वेधतायत लक्ष

Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाने डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारताने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात फक्त 130 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच, सामन्यात विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. विराटने डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली नेहमीच मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळते. अशात आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही विराटचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला. भारतीय संघाचा पहिला डाव संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाला उतरण्यापूर्वी विराट डान्स करताना दिसला. विराटने मैदानावर जोरदार ठुमके लावले. तो यावेळी वेगवेगळ्या स्टेप्स करतानाही दिसला. आता विराटचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. खरं तर विराटने या सामन्यात फलंदाजी करताना बऱ्याच वेळानंतर मारलेल्या पहिल्या चौकारानंतरही सेलिब्रेशन केले होते.

https://twitter.com/FanCode/status/1679914001571143680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1679914001571143680%7Ctwgr%5E7cf7278cb4c7a10f42ba186970dc06f6af0f1dc4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fvirat-kohli-dance-video-viral-in-ind-vs-wi-1st-test-match-1104025

विराटचा विक्रम
या सामन्यात विराट कोहली याच्याकडे शतक ठोकण्याची संधी होती. मात्र, त्याला शतकासाठी 24 धावा कमी पडल्या. त्याने यादरम्यान 182 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. या धावा करताना त्याने 5 चौकारही मारले. त्याने 147 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह हे त्याचे कसोटीतील 29वे अर्धशतक ठरले. हे त्याचे कसोटीतील तिसरे सर्वात संथ अर्धशतक आहे.

विराटने या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील 8500 धावांचा आकडाही पार केला. तो अशी कामगिरी करणारा भारताचा पाचवा खेळाडू आहे. त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकले आहे. याव्यतिरिक्त तो परदेशात सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. (cricketer virat kohli dance video viral in ind vs wi dominica1st test match)

महत्वाच्या बातम्या-
लेकाने शतक ठोकताच कांवड घेऊन यात्रेला निघाले वडील; म्हणाले, ‘यशस्वीने फक्त…’
तब्बल 47 वर्षांनंतर भारतासाठी ‘असा’ पराक्रम करणारा जयसवाल दुसराच खेळाडू, बातमी वाचलीच पाहिजे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---