---Advertisement---

मोठी बातमी – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

On: शनिवार, जून 13, 2020 3:00 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबद्दल स्वत: आफ्रिदीनेच ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की त्याला गुरुवारपासून बरे वाटत नसल्याने त्याने तपासणी केली होती. जी पॉझिटिव्ह आली आहे.

आफ्रिदीने ट्विट केले आहे की, ‘गुरुवारपासून मला बरे वाटत नव्हते. माझ्या शरीरात खूप वेदना होत होत्या. त्यामुळे मी तपासणी केली आणि दुर्दैवाने मी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला आता लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे.’

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1271720209657630720

४० वर्षीय आफ्रिदी हा पाकिस्तानचा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी तौफीक उमर आणि झाफर सर्फराज हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. पण ते आता ते बरे झाले असून १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन आहेत.

आफ्रिदीने कोरोना व्हायरसच्या संकटात त्याच्या ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन मार्फत’ काही सामाजिक कामे केली होती. त्याचे कौतुक युवराज सिंग आणि हरभजननेही केले होते. पण याबरोबरच आफ्रिदी मागील काही दिवसांमध्ये त्याच्या वादग्रस्त विधानांमुळेही अनेकदा चर्चेत आला होता.

आफ्रिदीने १९९६ ला पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५२४ सामने खेळले असून १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच ४०० पेक्षा अधिक विकेट्स त्याने घेतल्या आहेत. २०११ च्या विश्वचषकात आफ्रिदीने पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

‘या’ चेंडूमुळे माझी क्रिकेटमधली कारकीर्द वाचली; हरभजन सिंगचा खुलासा

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन

अबब! वयाच्या ३६व्या वर्षी हा पाकिस्तानचा खेळाडू करतोय संघात चौथ्यांदा कमबॅक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---