---Advertisement---

शाहीन आफ्रिदीच्या गळ्यात लग्नाची माळ, मुलीच्या लग्नात पाकिस्तान संघासोबत दिसला शाहिद आफ्रिदी

On: शनिवार, फेब्रुवारी 4, 2023 11:59 AM
Shaheen Afridi Wedding
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लग्नबंधनात अडकला. पाकिस्तान संघाचा मादी दिग्गज अष्टपैलू आणि कर्णदार शाहिद आफ्रिदी याच्या मुलीशी शाहीनची लग्नगाठ बांधली गेली. शाहीनच्या नव्या नवरीचे नाव अंशा आफ्रिदी असे आहे. शुक्रवारी (3 जानेवारी) कराचीमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम देखील थाटामाटात पार पडला.

पाकिस्तानच्या लोकल न्यूज चॅनलकडून शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि अंशा आफ्रिदी यांच्या लग्नाची सविस्तर माहिती दिली गेली. माध्यमांतील वृत्तांनुसार पाकिस्तान क्रिकेट संघातील काही महत्वाचे खेळाडू लग्नासाठी उपस्थित होते. यापैकी बाबर आझम (Babar Azam), सरफराज अहमद (Sarfaraz Ahmad), शादाब खान (Shadab Khan) आणि नसीम शाह यांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहीनच्या लग्नात पाकिस्तानचे स्क्वॅश खेळातील दिग्गज जहांगीर खान, इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशंसचे माजी महासंचालक असीम बाजवा आणि आयसीसीचे जनरल मॅनेजर वसीम खान या महत्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ शाहीन आफ्रिदीच्या रिसेप्शन पार्टीचा आहे. व्हिडिओत युवा वेगवान गोलंदाजासह बाबर आझम आणि सरफराज अहमद यांच्यासह संघातील इतर खेळाडू एकत्र बसल्याचे दिसत आहे. शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी (Ansha Afridi) यांचे लग्न मागच्या बऱ्याच दिवसांपूर्वी ठरले होते. पण शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची मुलगी अंशाचे शिक्षण सुरू असल्यामुळे लग्न केले गेले नाही. शुक्रवारी अखेर दोघांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली.

https://twitter.com/iamqadirkhawaja/status/1621495243974578176?s=20&t=8jBXCAM83ll0Hbeek2gwmA

दरम्यान, यावर्षी भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. शाहीनच्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने पाकिस्तान संघासाठी आतापर्यंत 25 कसोटी, 32 वनडे आणि 47 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमधीय 42 डावांमध्ये त्याने आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहीन आतापर्यंत 62 आणि 58 विकेट्स घेतल्या आहेत.  (Shahid Afridi’s daughter Ansha Afridi and Shaheen Shah Afridi got married)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

दादा धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी! सुपर किंग आणि प्रिंस ऑफ कोलकाताच्या भेटीचा फोटो व्हायरल
लग्न रद्द करून आयपीएल-रणजीत चमकला, भारतीय संघात जागा मिळवली पण प्रशिक्षकांचा विश्वास जिंकणे बाकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---