---Advertisement---

मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार

On: बुधवार, एप्रिल 17, 2024 2:38 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा 31 वा सामना मंगळवारी (16 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. राजस्थानला विजयासाठी 224 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून गाठलं .

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. तो आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमी स्टेडियममध्ये उपस्थित असतो. मंगळवारीही तो ईडन गार्डन्सवर उपस्थित होता. या रोमांचक सामन्यात असे अनेक क्षण आले जेव्हा शाहरुख खान संघाला उत्साहानं चिअर करताना दिसला. त्याच वेळी जेव्हा त्याच्या चित्रपटातील गाणी स्टेडियममध्ये वाजायची, तेव्हा तो डान्सही करायचा.

 

 

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात ‘किंग खान’ सामन्याचा आनंद घेताना आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतोय. त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर केकेआरचा पराभव झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्या वेळी त्याचे डोळे ओले झाले होते.

 

 

सामना संपल्यानंतर शाहरुख खाननं राजस्थान आणि कोलकात्याच्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं. या सामन्यानंतर शाहरुखचं क्रिकेटवरील प्रेम पाहून सोशल मीडिया युजर्सननं त्याचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं लिहिलं, “शाहरुख खान निराश झाला, कारण त्याचा संघ मॅच हरला, परंतु तो सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतोय. सर्व संघ मालकांनी शाहरुख खानसारखं असलं पाहिजे.” त्याचवेळी दुसऱ्या युजरनं लिहिलं, “शाहरुख स्टेडियममध्ये आला की सामन्याचं संपूर्ण वातावरण बदलतं.”

सामन्याबद्दल बोलयचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 223 धावा केल्या. कोलकाताकडून सलामीवीर सुनील नारायणनं शानदार शतक ठोकलं. तो 56 चेंडूत 109 धावा करून बाद झाला. राजस्थाननं 224 धावांचं लक्ष्य 20 षटकांत 8 गडी गमावून गाठलं. राजस्थानकडून जोस बटलरनं धडाकेबाज फलंदाजी करत हंगामातील आपलं दुसरं शतक ठोकलं. तो 60 चेंडूत 107 धावा करून नाबाद राहिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलचे सर्वच्या सर्व 17 हंगाम खेळणारे 7 खेळाडू माहितीयेत का? पाहा यादी, ‘या’ तिघांसाठी यंदाची IPL असेल शेवटची

सुनील नारायणनं ठोकलं कारकिर्दीतील पहिलं शतक! आयपीएलमध्ये रचला अनोखा रेकॉर्ड

आवेश खाननं स्वत:च्याच गोलंदाजीत घेतला सीझनचा सर्वोत्तम झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; तुम्ही VIDEO पाहाच

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---