अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये बांग्लादेशने (Bangladesh vs Afghanistan 2nd ODI) ८८ धावांनी विजय मिळवला. बांग्लादेशच्या लिटन दासने १२६ चेंडूत १३६ धावा केल्या, त्यामध्ये त्याने १६ चौकारांसह २ षटकार मारले. लिटनच्या शानदार खेळीमुळे बांग्लादेशने सुरुवातीला खेळताना ५० षटकांत ३०६ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने ४५.२ षटकांत २१८ धावा करत सर्वबाद झाला. बांग्लादेशच्या लिटन दासला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यादरम्यान एक अशी गोष्ट घटली ती गोष्ट कायम लक्षात राहण्यासारखी आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब आल हसन (Shakib Al Hasan) या सामन्यानंतर चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मागील वर्षी ढाका येथे खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यादरम्यान शाकिबने गैरवर्तन करत स्टंप जमिनीवर आपटले, या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच्या चुकीच्या वागण्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. परंतु चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर त्याने खेळभावना दाखवत करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अफगाणिस्तानच्या १७ व्या षटक शाकिब टाकत होता, तेव्हा अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाहने तिसऱ्या चेंडूवर शाॅट मारला. तेव्हा चेंडू नाॅन स्ट्राइकरच्या स्टंपवर आदळला. त्यावेळी नॉन-स्ट्रायकर एंडवर फलंदाज रहमत शाह उपस्थित होता. स्ट्राईकवर असलेल्या फलंदाज नजीबुल्लाने शॉट मारला, तेव्हा चेंडू गोलंदाज शाकिबच्या हातातून गेला आणि नॉन-स्ट्राईक स्टंपला लागला. त्यानंतर खेळाडूंनी धावबाद झाल्याची अपील केली. त्यावेळी मैदानावरील पंचांनी रहमतला बाद घोषित केले.
तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर असे दिसले की, चेंडू शाकिबच्या हातात आहे आणि फलंदाज क्रीझपर्यंत पोहोचू शकला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला धावबाद दिले. त्यानंतर जेव्हा तिसऱ्या पंचाने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला धावबाद दिले, तेव्हा शाकिबने आपला सहकारी खेळाडू तमीम इक्बालशी बोलून धावबादचे अपील मागे घेतले. तो पंचांना म्हणाला, चेंडू हाताला लागला नाही. शाकिबला पूर्ण खात्री नव्हती की, चेंडू आपल्या हाताला लागला आहे. तोपर्यंत रहमतने तंबू गाठला होता. परंतु त्यानंतर बांग्लादेशने पुन्हा आपले अपील माघारी घेतले आणि रहमत पुन्हा मैदानात आला.
शाकिबच्या या कामगिरीमुळे त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. रहमतने ७१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. परंतु आपल्या संघाला यश मिळवून देऊ शकला नाही. नजीबुल्लाहने ६१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. बांग्लादेशकडून खेळताना तस्कीन अहमद आणि शाकिब या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. बांग्लादेश संघाने एकदिवसीय मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर






