टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने जवळपास एका वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात बंगालकडून खेळताना सात विकेट्स घेतल्या होत्या. दुखापतीतून परतल्यामुळे तो तंदुरुस्त नसल्याने भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. असा मीडियाचा दावा आहे. बीसीसीआयने देखील शमीबाबत कोणतेही घाई करणार नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला आगामी आयपीएल लिलावात मोठी बोली लागणार नाही. अशी प्रतिक्रिया माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी दिली होती. आता संजय मांजरेकरांच्या या वक्तव्यावर मोहम्मद शमीने थेट प्रत्युत्तर दिले आहे.
वास्तविक, याआधी संजय मांजरेकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले “संघ नक्कीच त्याच्यासाठी (शमी) बोली लावतील पण शमीचा दुखापतीचा इतिहास आणि त्याच्या आधीच्या दुखापतीतून पुनरागमन करण्यासाठी लागणारा बराच वेळ लक्षात घेता त्याला मोसमाच्या मध्यात दुखापत होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या फ्रँचायझीने त्याच्यावर खूप पैसा खर्च केला आणि त्याला हंगामाच्या मध्यात तो बाहेर पडल्यास, तर त्यांच्याकडे खूप कमी पर्याय असतील आणि त्यामुळे त्याचे मूल्य खाली येऊ शकते”. अशी टिप्पणी संजय मांजरेकरांनी केली होती. आता यावर स्वत: शमीने सोशल मीडियातून उत्तर दिले आहे.
मोहम्मद शमीने त्याच्या आधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केले आहे. ज्यात संजय मांजरेकरांच्या त्या वक्तव्यावर खडसून उत्तर दिले आहे. ज्यात शमीने असे लिहले, ‘बाबाजींचा जय हो..! थोडेसे ज्ञान तुमच्या भविष्यसाठी राखून ठेवा पुढे कामी येईल संजय जी? कोणाला भविष्य जाणून घ्यायचे असेल तर सरांना (संजय मांजरेकर) भेटा’.
Mohammed Shami’s Instagram story on Sanjay Manjrekar’s statement about the price tag for IPL 2025 ⚡ pic.twitter.com/04fCmsoK7U
— Johns. (@CricCrazyJohns) November 21, 2024
घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शमी एका वर्षाच्या कालावधीनंतर स्पर्धात्मक खेळात परतला. त्याने मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात बंगालसाठी प्रभावी कामगिरी केली आणि सात विकेट्स घेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता मोहम्मद शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा-
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध कांगारुंचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
भारतीयांना लवकरच पाहायला मिळणार ‘मेस्सी’ची जादू! विश्वविजेत्या अर्जेंटिनाची टीम भारत दौऱ्यावर येणार