भारत आणि श्रीलंका यांच्यातील एक रोमांचाक सामना मंगळवारी (10 जानेवारी) चाहत्यांना पाहायला मिळाला. भारताने हा सामना 67 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला. श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका शतकीय खेळीपासून अवघ्या दोन धावा दुर असताना शमीने त्याला जवळपास बाद केलेच होते. पण रोहितच्या एका निर्णयामुळे शनाकाची विकेट वाचली.
शेवटच्या षटकात कसून रजिथा (Kasun Rajitha) आणि कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) श्रीलंकेसाठी फलंदाजी करत होते. श्रीलंकन संघाच्या हातातून हा सामना शेवटच्या षटकापूर्वीच निसटला होता. कारण त्याला शेवटच्या 6 चेंडूत त्यांना विजय मिळवण्यासाठी 86 धावांची गरज होती. विजयाच्या आशा मावळल्या असल्या, तरी दसून शनाका मात्र शतकापासून अवघ्या 5 धावा दूर होता. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दोन, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धावा घेतली. आता शतकासाठी शनाकाला अजून दोन धावा आवश्यक होत्या. पण चौथा चेंडू टाकला जाण्याआधीच तो बाद होऊ शकत होता.
शेवटच्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी मोहम्मद शमी (Mohammad Shami) धावात आला. त्यावेळी स्ट्राईकवर कासून रजिथा () होता, पण शमीने हा चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकण्याआधीच नॉन स्ट्राईकवरील शनाकाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. शमीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण शनाका त्यावेळी शतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता. शमीने शनाकाच्या विकेटसाठी पंचांकडे अपील केली, पण तितक्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शमीला अपील मागे घेण्यास सांगितले. रोहितच्या या निर्णयावर चाहत्यांकडून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते रोहितचा निर्णय बरोबर होता, तर काहींच्या मते रोहितने शमीला अपील मागे घेण्यास सांगणे, चुकीचे होते.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1612840573907632134?s=20&t=kQDoYIN8LKkvqVHHnzFZgA
दरम्यान, रोहितच्या सांगण्यावरून शमीने आपील मागे घतेली, ज्याचा फायदा शनाकाने पुरेपूर उचलला. शनाकाने शेवटच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे चौकार आणि शटकार कुटत स्वतःचे शतक पूर्ण केले. शनाकाने 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. त्याच्या या शतकाच्या जोरावर श्रीलंकन संघ 8 बाद 306 धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर पथून निसांका (Pathum Nissanka) याने देखील 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
https://twitter.com/ShakibSarafat/status/1612848970157391872?s=20&t=lskN2fRpMrECpv1MJ5xBFQ
भारताच्या प्रदर्शनचा विचार केला, तर विराटने सर्वाधिक 113 धावा केल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्मा याने 83, तर शुबमन गिल याने 70 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज 2, तर नवघ्या उमरान मलिक (Umran malik) याने 3 विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात चर्चेत राहिलेल्या शमीने सर्वात जास्त 67 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेऊ शकला. (Shami run-out Shanaka in the non-striker end then Rohit & Shami decided to withdraw the appeal.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टेबल टॉपर विराट आणि वॉर्नरच्या शतकांमध्ये मोठी तफावत, रुट आणि स्मिथ राहिला खूपच मागे
VIDEO | मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी, कुसल मेंडिसला केले क्लीन बोल्ड






