ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा ट्रार फलंदाज आणि डेव्हिड वॉर्नर याच्याविषयी एक मोठी बातमी मंगळवारी (2 जानेवारी) समोर आली. माध्यमांतील वृत्तांनुसार वॉर्नरनची बॅगी ग्रीन कॅप चोरीला गेला आहे. मेलबर्नवरून सिडनीपर्यंतचा प्रवास विमानाने करताना वॉर्नरचे एक बॅगपॅक चोरीला गेले. यामध्येच त्याची ही बॅगी ग्रीन कॅप देखील होती. याच पार्श्वभूमीवक पाकिस्तानचा कर्णधार शान मसून याने मोठी प्रतिक्रिया दिली.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) सिंडनीमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. वॉर्नरसाठी हा कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असणार आहे. दिग्गज सलामीवीर फलंदाज आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात जास्तीत जास्त धावा कशा करता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. पण या महत्वाच्या सामन्यापूर्वी वॉर्नरला एक धक्का बसला आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात वॉर्नर आपल्या बॅगी ग्रीन कॅपसह मैदानात उतरण्याची शक्यता होती. पण ऐन वेळी ही कॅप चोरीला गेल्याचे समजते.
कॉनत्याही क्रिकेटपटूसाठी आपली बॅगी कॅप महत्वाची असते. पण कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात वॉर्नरला ही कॅप घालता आली नाही, तर हे नक्कीच त्याच्यासाठी निराशाजनक असेल. याच पार्श्वभूमीवर शान मसूद याने संपूर्ण देशात शोध घेऊन वॉर्नरची कॅप शोधावी असा सल्ला ऑस्ट्रेलिया सरकारला दिला आहे. पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, “ऑस्ट्रेलिया सरकारने पूर्ण देशात शोध मोहीम राबवली पाहिजे. ही बॅग शोधण्यासाठी शक्यतो आपल्याला सर्वोत्तम जासूसांची गरज भासू शकते. डेव्हिड वॉर्नर मोठा खेळाडू आहे आणि तो प्रत्येक सन्मान आणि सेलिब्रेशनसाठी पात्र आहे. त्याचे बॅगपॅक लवकरच मिळेल, अशी आशा करतो. कारण कोणत्याही क्रिकेटपटूसाठी ही सर्वात मौल्यवान वस्तू असते.”
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर पाकिस्तान संघाला व्हाईट वॉश स्वीकारावा लागेल. (Shan Masood’s Big Statement After David Warner’s Baggy Green Cap Was Stolen)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तान क्रिकेटचा ट्रॉटवर विश्वास! वर्ल्डकप परफॉर्मेंसमुळे भारत दौऱ्यात मुख्य प्रशिक्षकपदी कायम
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषित, कर्णधार कमिन्सने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास