पाकिस्तान संघाला 23 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघावर अनेक जण टीका करत आहेत. अशात आता न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन बॉंड याने बाबर आझम याला या विश्वचषकातील सर्वात खराब कर्णधार म्हटले आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना बॉंड याला स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधारांविषयी विचारले जात होते. सुरुवातीला त्याला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यापैकी उत्कृष्ट कोण असे विचारले. त्यावेळी त्याने स्कॉट याचे नाव घेतले. त्यानंतर त्याने इतरही कर्णधारांवर प्रतिक्रिया देत अखेरीस न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याला स्पर्धेतील सर्वात हुशार कर्णधार म्हणून घोषित केले.
पाकिस्तान संघाने या विश्वचषकात चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या सामन्यात नेदरलँड्स आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यानंतर मात्र पाकिस्तान संघाला भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने मात दिली. या तीन पराभवामुळे आता त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या संधी काहीशा कमी झाल्या आहेत. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. तसेच, इतर संघांच्या कामगिरीवर देखील त्यांचे हे स्थान अवलंबून असेल. संघाच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर 27 ऑक्टोबर रोजी त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे.
(Shane Bond Said Scott Edwards Better Captain Than Babar Azam In 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, सामन्यात एकूण 5 धुरंधरांचे पुनरागमन; पाहा Playing XI