ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या फिरकीसमोर संपूर्ण जगाचे फलंदाज नतमस्तक होत असत. वॉर्न क्रिकेटच्या मैदानापासून दूर झाला असला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता त्याने डीआरएसबाबत एक कोपरखळी मारली आहे. वॉर्नने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि त्यात त्याने कॅप्शनसह ‘स्माईल’ इमोजी लावले आहे.
शेन वॉर्नने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील विक्रम दिसत आहे. ज्यात लिहिले आहे की १०३ कसोटी सामने, ४६१ विकेट, स्ट्राईक रेट ६२.२०, सरासरी २६.२० आणि सर्वोत्तम ८ विकेट ७१ धावा. यानंतर, वॉर्नने लिहिलेले कॅप्शन असे आहे की, डीआरएससह आणखी किती? म्हणजे डीआरएसनंतर माझ्याकडे किती विकेट्स झाल्या असत्या. वॉर्न ज्यावेळी क्रिकेट खेळत होता, त्यावेळी कोणताही डीआरएस नियम नव्हता.
शेन वॉर्नने पोस्ट केलेली क्लिप पाकिस्तानसोबतच्या कसोटी सामन्याची आहे. ज्यामध्ये तो गोलंदाजी करतो आणि पायचीतसाठी जोरदार आवाहन करतो. पण पंच स्टीव्ह बकनर त्याच्या जोरदार अपीलला नकार देतात. तर रिप्लेमध्ये स्पष्टपणे चेंडू मधल्या स्टंपवर आदळताना दिसून येत होता. त्याच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी म्हटले आहे की, तू शतकाचा सर्वोत्तम गोलंदाज आहेस आणि तुझ्याकडे १० हजार विकेट्स असत्या.
How many more with DRS ???????????????????????????????????????????? https://t.co/LEXQbHo8ov
— Shane Warne (@ShaneWarne) October 7, 2021
डीआरएसचे पूर्ण रूप म्हणजे डीसीजन रिव्ह्यू सिस्टीम. याला युडीआरएस असेही म्हणतात. युडीआरएसला म्हणजे अंपायर डीसीजन रिव्ह्यू सिस्टीम. डीआरएसच्या सहाय्याने तुम्ही पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकता. खेळताना, जर एखाद्या संघाला असे वाटते की अंपायरने चुकीचा निर्णय दिला आहे, तर ते डीआरएस वापरू शकतात.
‘टी’ अशी हाताद्वारे खून करून डीआरएस घेतला जातो. डीआरएसचा निर्णय १५ सेकंदाच्या आत कर्णधाराला निर्णय घ्यावा लागतो. जर त्यापेक्षा जास्त वेळ झाल्यास डीआरएस दिला जात नाही. जेव्हा टी अशी सांकेतिक खून करुन डीआरएस घेतला जातो, तेव्हा तो निर्णय तिसऱ्या पंचाला पहावा लागतो. तिसरा पंच पुन्हा संपूर्ण घटना पाहतो, जर मैदानावरील पंचाने घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर तो तो बदलून आपला निर्णय देतो, जर मैदानावरील पंचाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे आढळले, तर त्यात कोणताही बदल केला जात नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
प्ले ऑफपूर्वी चेन्नईला बसू शकतो मोठा धक्का; ‘हा’ स्टार फलंदाज होऊ शकतो स्पर्धेतून बाहेर
हैद्राबादला ‘या’ धावांवर सर्वबाद केलं तर मुंबई जाणार प्ले-ऑफमध्ये
बड्डे आहे भावाचा..! चेन्नईच्या ताफ्यात ब्रावोचा वाढदिवस जल्लोषात साजरा, व्हिडिओ तूफान व्हायरल





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा