---Advertisement---

कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही 

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि अँड्र्यू सायमंड्स यांची क्रिकेट कारकिर्द विवादांनी भरलेली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांच्या या वाईट सवयीत बदल झाले नाहीत. नुकतेच बिग बॅश लीग २०२०-२०२१ मध्ये झालेल्या एका सामन्यादरम्यान समालोचन करताना त्यांनी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज मार्नस लॅब्यूशानेवर अभद्र टिप्पणी केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली. यानंतर प्रसारणकर्ता कायो स्पोर्ट्सला लोकांची क्षमा मागावी लागली आहे.

सिडनी कसोटीतील लॅब्यूशानेच्या प्रदर्शनावर भडकले वॉर्न-सायंमड्स

शुक्रवारी (०८ जानेवारी) बिग बॅश लीग २०२१ मधील ३३वा सामना ऍडलेज स्ट्राईकर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स संघात पार पडला. या सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये वॉर्न आणि सायमंड्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या सिडनी कसोटीतील लॅब्यूशानेच्या फलंदाजीची चर्चा करत होते. त्यावेळी त्यांना माहित नव्हते की बीबीएल सामन्याचे लाईव्ह प्रसारण सुरु झाले आहे. त्यामुळे ते कसोटी सामन्याबद्दल चर्चा करत होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी न केल्याचे म्हणत दोघांनीही लॅब्यूशानेविषयी बोलताना अतिशय वाईट शब्द वापरले. सोबतच पुढील डावात त्याला चांगली फलंदाजी करण्याचा सल्ला दिला.

वॉर्न आणि सायमंड्स यांच्या या वैयक्तिक चर्चेचा क्लिप सोशल मीडियावर शेअर झाली. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. पुढे हे प्रकरण इतके वाढले की, बिग बॅश लीग सामन्यांचे प्रसारण करणारे प्रसारणकर्ता कायो स्पोर्ट्स यांना नेटकऱ्यांची क्षमा मागावी लागली.

प्रसारणकर्ता यांनी म्हटले की, “चुकीने आमचे थेट प्रक्षेपण वेळेपुर्वीच चालू झाले होते. दरम्यान काही अपशब्द आमच्या कानी आले. या चुकीसाठी कायो स्पोर्ट्स आणि त्यांच्या समालोचन टीमकडून आम्ही आपणा सर्वांची क्षमा मागतो.”

https://twitter.com/stevebarrett88/status/1347450792102383618

सिडनी कसोटीत लॅब्यूशानेने केल्यात ९१ धावा

भलेही वॉर्न आणि सायंमड्स यांनी लॅब्यूशानेच्या फलंदाजीवर टीका केली असली, तरी त्याने सिडनी कसोटीत प्रशंसनीय खेळी केली आहे. गुरुवारपासून (०७ जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या होत्या. यात लॅब्यूशानेच्या ९१ धावांचे योगदान होते. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १९६ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

…अन् पेन भाऊची सटकली! अंपायरशी हुज्जत घालत केली शिवीगाळ?

जॉस हजलेवुडच्या शानदार थ्रोवर हनुमा विहारी धावबाद, बघा व्हिडिओ

AUS vs IND : रिषभ पंतनंतर टीम इंडियाला आणखीन एक धक्का, जडेजा मैदानाबाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---