ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आणि जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव शेन वॉर्न (Shane Warne) आज या जगात नाही. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थायलंडमध्ये असताना त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला आणि यामध्ये त्यांचे निधन (Shane Warne Death) झाले. वॉर्न जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असला, तरी फलंदाजीत त्यांच्या नावावर एक महत्वाचा विक्रम आहे.
शेन वॉर्न (Shane Warne) कसोटी क्रिकेटमधील जगातील दुसरे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. त्यांनी खेळलेल्या 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या 194 सामन्यांमध्ये 293 विकेट्स त्यांनी घेतल्या. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 1999 सालच्या विश्वचषकात वॉर्नची भूमिका महत्वाची होती.
गोलंदाजीत त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहेत, पण फलंदाजीतही एक विक्रम त्यांनी स्वतःच्या नावावर नोंदवला. शेन वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक न करता सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू आहेत. त्यांनी 145 कसोटी सामन्यांमधील 199 डावात 17.32 च्या सरासरीने 3154 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 12 अर्धशतके केली. यामध्ये त्यांची सर्वात मोठी खेळी 99 धावांची होती. शतक न करता सर्वात जास्त कसोटी धावा करणाऱ्यांमध्ये श्रीलंका संघाचा निरोशान डिकवेल्ला दुसऱ्या क्रमांकावर आहे. डिकवेल्लाच्या नावावर 2443 कसोटी धावा आहेत आणि तो भविष्यात वॉर्नचा विक्रम मोडू शकतो.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पर्थवरीवल 2001 सालच्या सामन्यात शेन वॉर्नकडे शतक करण्याची संधी होती, पण थोडक्यात ती हुकली. या सामन्यात वॉर्न 99 धावा करून बाद झाले होते. शतक करण्यासाठी अवघी एक धावा कमी असताना डॅनियल विटोरीच्या चेंडूवर वॉर्नने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची विकेट गमावली. मिड विकेटवर तैनात असलेल्या मार्क रिचर्डसनने त्याचा झेल पकडला आणि वॉर्न तंबूत परतला.
या शॉटविषयी बोलताना वॉर्न म्हणाला होते की, ‘मी स्वतःला दररोज हा प्रश्न विचारतो की, त्या चेंडूवर एक धाव का घेतली नाही.’ दरम्यान, नंतर जेव्हा रिव्ह्यू पाहिला गेला, तेव्हा असे लक्ष्यात आले होते की, ज्या चेंडूवर वॉर्नची विकेट घेतली गेली होती, तो चेंडू टाकताना गोलंदाजाचा पाय क्रिजच्या पुढे आला होता. परंतु हा चेंडू नो बॉल आहे, ही गोष्ट त्यावेळी पंचांच्या लक्षात आली नसल्यामुळे वॉर्नला विकेट गमवावी लागली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लिजेंड वॉर्नी’चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा
वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत