भारत आणि ऑस्ट्रेलिया या प्रतिस्पर्धी संघांमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे बिगुल वाजले आहे. गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली असुन पहिल्या दिवसाखेर ६ बाद २३३ धावा केल्या आहेत. परंतु, सामन्यापेक्षा जास्त सामन्याचे समालोचन करत असलेल्या शेन वॉर्नची जास्त चर्चा रंगली आहे. भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराविषयी केलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे या चर्चांना वाचा फुटली.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकात संघाने सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याची शून्यावर विकेट गमावली. तर मंयक अगरवालही १८.१ षटकात केवळ १७ धावांवरच त्रिफळाचीत झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली मिळून संघाचा डाव पुढे नेत होते.
..म्हणून चाहत्यांनी केले शेन वॉर्न यांना ट्रोल
पण कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा पुजारा अत्यंत धीम्या गतीने फलंदाजी करत होता. त्याने तब्बल १६० चेंडूत ४३ धावा केल्या. यादरम्यान त्याने फक्त २ चौकार लगावले. त्यातील पहिला चौकार त्याने १४८ व्या चेंडूनंतर ठोकला. त्यामुळे पुजाराच्या अशा खेळीला पाहता सामन्याचे समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नची जीभ घसरली. त्यांनी बोलताना पुजाराला ‘स्टिव्ह’ असे म्हटले.
खरे तर, यॉर्कशायर क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पुजाराला हे नाव दिले होते. यॉर्कशायर संघाच्या खेळाडूंना पुजाराचे नाव घेताना अडचण होत होती. त्यामुळे त्यांनी पुजाराला ‘स्टिव्ह’ असे टोपणनाव दिले होते. पण काही दिवसांपुर्वीच पुजाराच्या या टोपणनावाला वर्णद्वेषाचे प्रतिक असल्याचे म्हटले गेले होते. एवढेच नव्हे तर, यॉर्कशायर संघाचा कर्णधार अझीम रफीकने यामुळे मैदानावर भेदभाव होत असल्यासंदर्भात कायदेशीर तक्रार दाखल केली होती. ज्याची अद्याप चौकशी चालू आहे.
म्हणून, शेन वॉर्नने पुजाराला स्टिव्ह असे म्हटल्यामुळे चाहत्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Shane Warne, big Peaky Blinders fan – how do you rate the hat? #AUSvIND pic.twitter.com/HakSCznfqG
— News Cricket (@NewsCorpCricket) December 17, 2020
Sick. Casual racism.
— Jamie Alter 🇮🇳 (@alter_jamie) December 17, 2020
Referring to Pujara as ‘Steve’ is:
a) unprofessional
b) disrespectful
c) racistLearn to say his name
— Siddhartha Vaidyanathan (@sidvee) December 17, 2020
Especially in the context of what's happening in Yorkshire cricket, when that nickname takes on a different hue.
— Karthik Krishnaswamy (@the_kk) December 17, 2020
यॉर्कशायर संघाकडून खेळल्यामुळे झाला फायदा
पुजारा काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघाचा सदस्य आहे. त्याने या संघाकडून चांगले प्रदर्शन केले आहे. यामुळे २०१८-१९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून खेळताना त्याला खूप मदत मिळाली होती. पुजाराने त्या कसोटी मालिकेत तीन शतकांसह ५२१ धावा केल्या होत्या. त्याच्या या योगदानामुळे भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर विजयी पताका झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण
IND Vs AUS : ऍडलेड कसोटी सामन्यात हादरली ‘पृथ्वी’! Video व्हायरल